कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून म्हणजेच २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचा आदेश माहीती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव यशवंत गिरी यांनी दिला आहे.
कृष्णा कारखान्यांच्या निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उद्या मंगळवार 25 मे पासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. 25 मे ते मंगळवार 1 जून पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यास वेळ देण्यात आली आहे. बुधवारी 2 जून रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. गुरूवारी 3 जूनला सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज माघारी घेण्यास परवानगी असेल. शुक्रवारी 18 जूनला सकाळी 11 वाजता अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप करण्यात येईल. मंगळवारी 29 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान मतदान होणार आहे. तर निकाल गुरूवारी 1 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.
कृष्णेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश अष्टेकर म्हणून काम पाहणार आहेत. साखर कारखाना कार्यक्षेत्रात कोविड -19 च्या संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या अनुषंगाने शासनाचे आदेशाचे पालन करून व सामाजिक अतंर राखून अधिनियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.