Election Result Postponed : मोठी बातमी!! नगरपरिषद, नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार

Election Result Postponed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Election Result Postponed । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर आज अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि या निवडणुकीचा निकाल हा उद्या जाहीर करण्यात येणार होता. मात्र आता २१ डिसेंबरला नगरपरिषद, नगरपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे गुलालाची उधळण हि २१ डिसेंबरला पाहायला मिळेल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्यात येईल. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती आणि २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे आज ज्याठिकाणी निवडणुका आहेत, आणि मतदान सुरु आहे त्याचा निकाल सुद्धा म्हणजेच दोन्ही निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करावे असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उद्या मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार नाही. आता निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी सर्व निवडणुकीचे एकत्रित निकाल जाहीर होणार आहे.

काय परिणाम होणार- Election Result Postponed

निकालाची तारीख पुढे ढकलल्यामुळे आता प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील. तसेच सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये २१ डिसेंबर पर्यंत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे, लक्ष्य ठेवावं लागेल. काही गडबड तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.