भारतात लवकरच सुरु होणार पहिली Electric Air Taxi

Electric Air Taxi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपासून एअर टॅक्सीची चर्चा सुरु होती. इतर देशात ती लाँच झाली मात्र भारतात तिचा तिची प्रतीक्षा कायम आहे. असे असताना आलेल्या माहितीनुसार लवकरच ही एअर टॅक्सी (Electric Air Taxi)  सुरु होणार आहे. आर्चरच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅण्डिंग मिडनाईट एअरक्राफ्टद्वारे ही एअर टॅक्सी सेवा देण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक एअर टॅक्सी 2026 पर्यंत रस्त्यावर धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी भारतातील एअरलाईन इंडिगो को ऑपरेट करणारी कंपनी इंटरग्लोब एंटरप्रायजेसने अमेरिकेतील आर्चर एव्हिएशनशी भागीदारी केली आहे. त्यांनी या करारावर सह्या केल्या आहेत.

दिल्ली ते गुरुग्राम अंतर केवळ 7 मिनिटात

दिल्लीतील कॅनॉट प्लेसपासून गुरुग्रामपर्यंतचे अंतर कापण्यासाठी साधारणपने 60 ते 90 मिनिटे लागतात. परंतु या करारामुळे अवघ्या 27 किलोमीटरवर हे अंतर येऊन ठेपले आहे. त्यानुसार या एअर टॅक्सीच्या माध्यमातून आता हे अंतर पूर्ण करण्यासाठी केवळ 7 मिनिटाचा अवधी लागणार आहे.

कसे काम करेल ही टॅक्सी

ही इलेक्ट्रिक एअर टॅक्सी हेलिकॉप्टर प्रमाणे असणार आहे. मिडनाईट एअरक्राफ्ट हे एकामागून एक उडाण भरू शकते. त्यामुळे यास रन वे ची गरज भासणार नाही असे कंपनीने सांगितले आहे. आर्चरचे दोनशे मिडनाईट एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी निधी जमवण्याची योजना आखण्यात आली असून या कामास गती निर्माण झाली आहे. ही टॅक्सी आल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरिकांना सतावणार नाही आणि प्रदूषणही आटोक्यात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.माध्यमाशी बोलताना कंपनीने सांगितले की, “ही टॅक्सी लाँच करण्यामगचा मुख्य उद्देश म्हणजे देशाला क्रांतिकारक ट्रान्सपोर्टेशन सॉल्यूशन पुरवठा करणे आहे.”