हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची पसंती पाहता मागील वर्षभरात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि कार बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Erik Buell ने आपल्या इलेक्ट्रिक ब्रँड FUELL अंतर्गत 2 इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. Flluid-2 आणि Flluid-3 अशी या दोन्ही सायकलींचे नाव आहेत. चला आज आपण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक सायकलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत….
बॅटरी पॅक-
कोणतीही बाईक किंवा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना आपण त्याची रेंज चेक करतो. म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर आपलं वाहन जास्तीत जास्त चालावं अशी आपली इच्छा असते. Erik Buell ने हीच गोष्ट लक्षात ठेवून या दोन्ही इलेक्ट्रिक सायकली बनवल्या आहेत. यातील Flluid-2 मध्ये कंपनीकडून अल्ट्रा-रेंज 2 kWh क्षमतेच्या दोन रिमूव्हेबल बॅटरी पॅक देण्यात आला असून एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल तब्बल 350 किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे Fluid-3 ला कंपनीने 1 kWh क्षमतेची बॅटरी दिली असून ही बॅटरी एका चार्जमध्ये 180 किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकेल. म्हणजेच कोणत्याही कार पेक्षाही या इलेक्ट्रिक सायकलला जास्तीची रेंज मिळतेय.
या इलेक्ट्रिक सायकल मध्ये कंपनीकडून 2000 Wh ची बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी 3 Amp फास्ट चार्जरने चार्ज करता येईल. तुम्ही अवघ्या 6 तासांत ही सायकल फुल्ल चार्ज करू शकता असा दावा कंपनीने केला आहे.
फीचर्स
या सायकलींच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, या सायकलला, समोरील बाजूस हेडलाईट देण्यात आले असून त्याच्याशेजारीच हँडलबारवर 2.3 इंचाची स्क्रीनही देण्यात आली आहे. या स्क्रिनवर तुम्हांला सायकलचे स्पीड, अंतर, बॅटरी स्टेट्स, असिस्टंट मोड, गिअर पोझिशन, ब्लूटूथ आणि लॉक इत्यादींची माहिती दिसेल. याशिवाय या बाइकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रिमोट लॉक/अनलॉक, अँटी थेफ्ट वॉर्निंग सारखे ऍडव्हान्स फिचर्स देखील उपलब्ध असतील. एल्युमिनियम अलॉय फ्रेमवर आधारित या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 7-स्पीड गिअर देखील देण्यात आले आहेत.
या दोन्ही बाईकमध्ये इलेक्ट्रिक बाइक-स्पेसिफिक रोड टायर्स, इंटिग्रेटेड एलईडी लाइटिंग, फ्रंट सस्पेंशन, 450% गिअर रेंज, फेंडर/रॅक रॅक पॅकेज आणि कार्बन-बेल्ट ड्राइव्ह सेटअपसहीत ऑटोमॅटिक शिफ्टिंग मिळेल. या दोन्ही बाइकमध्ये हायड्रॉलिक डिस्क ब्रेक आणि बेल्ट ड्राईव्हट्रेन देण्यात आले आहेत.
किंमत –
Indiegogo वर एका क्राउडफंडिंग मोहिमेद्वारे ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. या दोन्ही सायकलींमधील Fluid-2 ची सुरुवातीची किंमत $3,999 तर Fluid-3 साठीची सुरुवातीची किंमत $3,699 असेल. भारतीय चलनात याचा हिशोब केल्यास जवळपास 3.28 लाख रुपये इतकी तिची किंमत ठरेल.