हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Bike । मागच्या काही वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठा कायापालट झाला आहे. पेट्रोल गाड्यांची जागा इलेक्ट्रिक गाड्या घेऊ लागलेत. तुम्हीही इलेक्ट्रिक स्कुटर किंवा बाईक बघितली असेल किंवा चालवली असेल, परंतु आता मार्केट मध्ये गियरवाली इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली आहे. Matter Aera असं या इलेक्ट्रिक बाईकचे नाव असून ही देशातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाईक ठरली आहे. कंपनीचा असा दावा आहे कि, एकदा फुल्ल चार्ज केली कि हि इलेक्ट्रिक बाईक तब्बल १७२ किलोमीटर अंतर आरामात पार करू शकते. बाईकचा लूक अतिशय आकर्षक असून तरुणाईला नक्कीच तिची भुरळ पडेल. कंपनीने या गिअर वाल्या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1,93,826 रुपये ठेवली आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.
लूक आणि डिझाईन – Electric Bike
Matter Aera लूक खूपच स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. यात LED लाईट्स, उत्तम फ्रंट आणि रियर लूक, आरामदायी सीट्स, एर्गोनॉमिक्स तसेच स्मार्ट ७-इंचाचा टचस्क्रीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक बाईक मध्ये ५ किलोवॅट क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे. एकदा का ही बॅटरी पूर्णपणे चार्ज केली कि ती तब्बल १७२ किलोमीटर रेंज देते. यामध्ये लिक्विड-कूल्ड पॉवरट्रेन आहे, जी भारतीय रस्त्यांसाठी खूप चांगली मानली जाते. अवघ्या २.८ सेकंदात हि इलेक्ट्रिक बाईक ०-४० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
मॅटर एरा इलेक्ट्रिक (Electric Bike) बाईकमध्ये ४ रायडिंग मोड उपलब्ध आहेत. ज्यामध्ये इको, सिटी, स्पोर्ट आणि पार्क असिस्ट मोडचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे मोड वापरू शकता. याशिवाय, ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल सस्पेंशन सिस्टम, स्मार्ट पार्किंग असिस्ट या बाईकची रायडींग आणखी छान वाटते. या बाईकमध्ये स्मार्ट की आणि मॅटरव्हर्स मोबाईल अॅप्लिकेशन आहे. ही बाईक रिमोटली लॉक/अनलॉक करता येते. याशिवाय, त्यात लाईव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग सुविधा देखील देण्यात आली आहे.
किंमत किती?
आता राहिला प्रश्न तो गाडीच्या किमतीचा, तर Matter Aera इलेक्ट्रिक बाईकची किंमत १,९३,८२६ रुपये आहे. बाईक आणि बॅटरीवर ३ वर्षांपर्यंत किंवा ४५,००० किलोमीटर पर्यंत वॉरंटी देण्यात येत आहे. तुम्ही ४ रंगात हि इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता.




