व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक बसची 17 वाहनांना धडक; 6 ठार तर 12 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश येथील कानपुर शहरात एक भीषण अपघात घडला. एका इलेक्ट्रिक बस ने तब्बल 17 गाड्यांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून या विचित्र अपघाताने शहरात खळबळ आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेने चालवण्यास सुरुवात केली आणि मध्येच जो दिसेल त्याला उडवून निघून गेला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे.

दरम्यान, मृत पावलेल्यांपैकी तिघांची ओळख पटली असून इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. जखमींवर टाटमिल येथील कृष्णा हॉस्पीटल आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.