हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Buses। एसटी बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात पुढील २ वर्षात २५,००० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या बस इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून, यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल. या निर्णयामुळे इंधन खर्च कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होईल.
खरं तर एसटी महामंडळाच्या अनेक आगारातील बस नादुरुस्त आहेत. त्या नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे राज्यात नव्या को-या विद्युत बस खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. राज्य एसटी महामंडळाने गेल्या वर्षी ५,१५० एसी इलेक्ट्रिक बस (Electric Buses) खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत फक्त २२० बस पुरविल्या होत्या, त्यामुळे कंपनीला इशारा पत्र देण्यात आले होते. आता कंपनीला बस पुरविण्याचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार, २०२५ मध्ये ६२० बस, २०२६ वर्षात २१०० बस आणि २०२७ पर्यंत उर्वरित बस पुरविल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल – Electric Buses-
यामध्ये १२ मीटरच्या २,८०० बस आणि ९ मीटरच्या २,३५० बस यांचा समावेश आहेया सुधारित वेळापत्रकानुसार बसचा पुरवठा होण्यासाठी, कोणताही विलंब होऊ नये, यासाठी एसटी महामंडळ लक्ष ठेवून असणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळच्या एका अधिकाऱ्याने दिली. या उपक्रमामुळे MSRTC च्या १४,००० बसच्या ताफ्यापैकी ३३% पेक्षा जास्त बस प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस (Electric Buses) असतील, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल, खास करून २०० किमीपेक्षा कमी अंतराच्या मार्गांसाठी या इलेक्ट्रिक बसेस बेस्ट पर्याय ठरतील. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे वातानुकूलित बस असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.




