Electric Scooter : BMW ने लाँच केली आकर्षक इलेक्ट्रिक स्कुटर; किंमत ऐकून तुमचेही होश उडतील

Electric Scooter BMW CE 02
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Electric Scooter : आज इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रँड BMW Motorrad ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जागतिक मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने CE 02 असे नाव दिले आहे. आज आपण BMW च्या इलेक्ट्रिक स्कुटरची वैशिष्टये, बॅटरी रेंज, आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात

 2 बॅटरी पॅक – Electric Scooter

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सिंगल आणि ड्युअल बॅटरीचे पर्याय दिले आहेत. सिंगल बॅटरीसह, या स्कूटरला 45 किमी टॉप स्पीड आणि फक्त 45 किलोमीटर रेंज मिळते. तर ड्युअल बॅटरी व्हेरिएंटची रेंज 90 किलोमीटर असून या स्कुटरचे टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे. ड्युअल बॅटरी पॅक 15hp पॉवर जनरेट करतो. ज्याचे वजन सिंगल बॅटरी पॅकपेक्षा 13 किलो जास्त आहे. ड्युअल बॅटरी पॅक फुल्ल चार्ज होण्यासाठी ५ तासांचा वेळ लागतो तर सिंगल बॅटरी अवघ्या तीन तासांत चार्ज होते.

BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये –

BMW च्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Electric Scooter) तुम्हाला अनेक वेगेवेगळी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये की-लेस गो, एलईडी हेडलाइट, रिव्हर्स गियर आणि 3.5-इंचाचा TFT डॅशबोर्ड मिळतो. चांगली गोष्ट म्हणजे यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे, जी यूजर्सला स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यापासून, ते नकाशे आणि राइड मोड सारखी वैशिष्टे प्रधान करते.

BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत –

या स्कूटरची किंमत भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या एंट्री लेव्हल कारशी तुलना करता येईल. या इलेक्ट्रिक स्कुटरच्या (Electric Scooter) लो-स्पीड व्हर्जनची किंमत $7,599 (सुमारे 6.2 लाख रुपये) आणि हाय लाइन व्हर्जनची किंमत $8,474 (सुमारे 7 लाख रुपये) निश्चित करण्यात आली आहे. अर्थात ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही.