Electric Spoon | जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण जेवणामध्ये मीठ टाकत असतो. मिठाशिवाय कोणत्याही जेवणाला चव येत नाही. ते स्वादिष्ट होत नाही. परंतु हेच मीठजर आपण जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्याचा आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मिठाचा वापर कमी करा. असेच डॉक्टर सल्ला देत असतात. अशातच आता शास्त्रज्ञांनी एक इलेक्ट्रिक चमचा तयार केला आहे. जो स्वतः अन्न खारट करतो. म्हणजे तुम्हाला जेवणात कोणत्याही प्रकारचे मीठ टाकायची गरज नाही. जेवणाला जेवढी गरज आहे तेवढे मीठ त्या इलेक्ट्रिक चमचा मधून येते. बाजारातही हा चमचा उपलब्ध आहे.
जपानमध्ये बॅटरीवर चालणारा हा एक अनोखा चमचा तयार केला आहे. त्यामुळे जेवणाची चव खारट होते. हा चमचा प्लास्टिक आणि धातूंनी बनलेला आहे. जे लोक मीठ कमी करण्यासाठी धडपड करतात, त्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला चमचा आहे. मेजी विद्यापीठातील प्रोफेसर होमी मियाशिता यांनी इतर संशोधकांसह ते विकसित केले आहे. अहवालानुसार, या ‘इलेक्ट्रिक सॉल्ट स्पून’ तंत्राने 2023 मध्ये Ig नोबेल पुरस्कार जिंकला आहे. हे असे व्यासपीठ आहे जे अद्वितीय संशोधनाचा सन्मान करते.
संशोधकांनी नोंदवले आहे की जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि इतर परिस्थितींचा धोका वाढवते. जपानमधील प्रौढ लोक दररोज सरासरी 10 ग्रॅम मीठ खातात, जे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे.
चमच्याची किंमत काय आहे? | Electric Spoon
किरीन या जपानी कंपनीचे म्हणणे आहे की, याच्या वापरामुळे अन्नातील खारटपणा दीड पटीने वाढतो. कंपनीने म्हटले आहे की वापरकर्ते त्यांच्या पसंतीची तीव्रता चार वेगवेगळ्या स्तरांवर निवडू शकतात. 20 मे रोजी लाँच झालेल्या या अनोख्या चमच्याची किंमत 19,800 येन (म्हणजे भारतीय चलनात 10,469.79 रुपये) आहे.