हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मार्केट मध्ये चांगलीच हवा बघायला मिळतेय. पेट्रोल- डिझेलच्या खर्चापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करायला आपली पसंती दाखवतायत. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती महाग असल्याने अनेकांना इच्छा असूनही ती खरेदी करता येत नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इलेक्ट्रिक गाड्यांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. विधानसभेत बोलत असताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गटाचे आमदार अनिल परब यांनी यांनी पर्यावरणाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी हि गुड न्यूज दिली. आपण इलेक्ट्रिक व्हेईकल बाबत आधी टॅक्स लावला नाही. 30 लाखांपर्यंतच्या गाड्यांना टॅक्स नाही, त्यावर 6 टक्के कर लावतोय. इलेक्ट्रिक वाहनांवरील तो टॅक्स मागे घेण्यात येईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत ईलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री करण्याचे सूतोवाच केले. तसेच, शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील, अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. शासकीय कार्यालयासाठी शक्य असेल त्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जातील, आमदारांना गाड्यांसाठी दिले जाणारे कर्ज केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार 2500 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा विचार करीत आहे. याशिवाय, मेट्रो आणि बसेसच्या माध्यमातून वाहतूक कोंडीवर उपाय करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितले. पिंपरी चिंचवडमध्ये ईव्ही वाहनांची संख्या वाढत आहे आणि टु-व्हिलर सेगमेंटमध्येही ईव्ही बाईक्सही विकल्या जात आहेत. ई-चार्जिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये ईव्हीच्या मोठ्या प्रकल्पांची सुरूवात झाली आहे, ज्यामुळे ते सिटी कॅपिटल म्हणून विकसित होत आहेत, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.