Electric Vehicles Subsidy | नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी निवडून आल्यामुळे आता लोकांना त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 2024 च्या बजेटमध्ये फेम 3 या योजनेची घोषणा करू शकतात. म्हणजेच आता सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर फास्टर अँडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicles Subsidy) ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेसाठी सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली जाऊ शकते.
या आधी सरकारने इलेक्ट्रिक दुचाकीवर सबसिडी (Electric Vehicles Subsidy) देण्यासाठी चालू केली होती. परंतु मार्चमध्ये अचानक ही योजना बंद झाली. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीमध्ये देखील घट निर्माण झाली होती. परंतु आता ही सबसिडी पुन्हा एकदा लागू केली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा फरक पडेल, असे मानले जात आहे.
मार्चमध्ये सरकारकडून ही योजना बंद झाली होती. आणि मिळणारे अनुदान देखील बंद केल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तसेच इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री ही कमी झाली होती. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कमी रेंजचे अनेक मॉडेल्सही लॉन्च केले होते. तसेच त्यात फीचर्स देखील आणले होते. जेणेकरून त्यांच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांनी हे कमी-कीमतीचे मॉडेल्स विकत घेतले असले, तरी टॉप मॉडेलची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.
परंतु आता सरकार पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही योजना पुन्हा चालू झाली तर इलेक्ट्रिक दुचाकीवर आता सरकारकडून सबसिडी मिळेल. त्यामुळे या दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढेल. आणि कंपन्यांना देखील त्यांचे टॉप मॉडेल विकता येईल. अशा प्रकारे सरकारने सुरू केलेल्या योजनेचा फायदा सगळ्यांनाच होईल.