Electricity Bill Rate | आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे. या नवीन आर्थिक वर्षांमध्ये अनेक बदल देखील झालेले आहेत. आजपासून विजेचे नवीन दर देखील लागू होणार आहे. त्यामुळे महावितरणाच्या ग्राहकांसाठी ही एक मोठी बातमी आहे. या विजेमध्ये इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे 10 टक्के विजेच्या बिलामध्ये (Electricity Bill Rate) दरवाढ होणार आहे. असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. वीज नियामक आयोगाच्या मार्च 2023 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही दरवाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मागील वर्षी म्हणजे मार्च 2013 मध्ये 2 वर्षासाठी दोन टप्प्यात वीज दरवाढ करण्याला मंजुरी दिली होती. या अनुषंगाने ही वीज तर वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 च्या तुलनेत आता 1 एप्रिल 2024 पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे.
आधी घरगुती प्रवर्गासाठी सिंगल फेजसाठी 116 रुपये लावायचे. परंतु 1 एप्रिल 2024 पासून आता 128 रुपये लागणार आहे. थ्री फेजसाठी पूर्वीच्या 385 ऐवजी 445 रुपये लागणार आहे. त्याचप्रमाणे वाणिज्य ग्राहकांना पूर्वी 470 रुपये लागत होते. परंतु आता 1 एप्रिलपासून 517 रुपये यासाठी लागणार आहेत. (Electricity Bill Rate) सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ग्राहकांना याआधी 1 ते 20 किलोवॅटसाठी 117 रुपये लागायचे. परंतु आता तेच वाढून 129 रुपये लागणार आहेत. त्याचप्रमाणे 20 ते 40 किलोवॅटसाठी ग्राहकाला याआधी 142 रुपये लागायचे. आता तेच दर वाढून त्या ग्राहकाला 156 रुपये द्यावे लागणार आहेत. 40 किलोवॅटसाठी वरील ग्राहकाला याआधी 137 रुपये लागायचे. परंतु आता 194 रुपये लागणार आहेत.
कृषी ग्राहकांना म्हणजे ज्यांच्याकडे मीटर नाही अशा ग्राहकांना 5 हॉर्सपावरपर्यंत पूर्वी 467 रुपये लागत होते. परंतु आता तेच वाढून त्यांना 563 रुपये लागणार आहेत. लघुउद्योगिक ग्राहकांना 20 किलोवॅट पर्यंत 530 रुपये लागायचे. आता ते 583 रुपये स्थिर आकार घेईल. पथदिव्यासाठी पूर्वी 129 रुपये लागायचे. परंतु आता तेच 142 रुपये लागणार आहेत. सरकारी कार्यालय आणि रुग्णालयांना 20 किलोवॅटसाठी पूर्वी 388 रुपये लागायचे परंतु आता 427 रुपये स्थिर आकार त्यांना पडणार आहे.