जिंतुर तालुक्यातील 16 गावे अंधारात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

जिंतुर तालूक्यातील सावंगी(भांबळे) व वझर परिसरात 10 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने 16 गावांतील वीजेमुळे भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठा खंडित असल्याने तांत्रिकदृष्ट्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे घराबाहेर रात्र काढावी लागत आहे. तालूक्यातील सायखेडा , उमरद ,बेलखेड , कवडा ,सावंगी(भां) , धमधम , असोला , कोरवाडी, संक्रळा , कोल्पा, कुंबेफाळ आदी गावांसह 16 गावांना अंधार आहे. वझर 33 के. व्ही. अंतर्गत बन बरडा , कुटे वझर , पिंपरी , बरडा ,आदी गावांना हिंगोली जिह्यातील सबस्टेशन हुन वीज पुरवठा जोडला आहे. विशेष म्हणजे बामणी हुन वझर 33 के.व्ही.ला वीज पुरवठा करणारे जवळपास 50 खांबे पडली आहे. परिसरातील मोबाईल टॉवर बंद पडलेत तसेच मोबाइलला चार्जिंग नसल्याने अनेकांचा संपर्क तुटला आहे

सावंगी(भांबळे) परिसरात दि.17 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यामुळे बरीच नुकसान झाली आहे. त्यामध्ये नागरिकांची घरे पडली , पत्रे उडून पिकांचे नुकसान झालय तर झाडे उन्मळून पडली आहेत आणि बामणीहुन वझर 33 के.व्ही .सबस्टेशन मेन लाईन ची 50 विजेचे खांब तुटून पडले व गावठाण लाईनचे जवळपास 45 खांबे पडले आहेत. यामुळे16 गावांना तांत्रिकदृष्ट्या पाणी टंचाई निर्माण झालीय .

“गेल्या आठ दिवसापासून खांबे पडले असून वीज वितरण कंपनी कडून कामे सुरू आहेत . मंगळवारी रात्री 10 वाजता वझर 33 के.व्ही.पर्यंत लाईन दुरुस्त केली आहे .मात्र सावंगी परिसरातील लाईन दुरुस्ती सुरू आहे उर्वरित गावांचा वीज पुरवठा लवकर सुरळीत होईल ” असे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आल आहे .

“वझर मेन लाईनचे काम झाले आहे या आठ दिवसात 24 खांबे आम्ही उभी केली आहेत मात्र ,पुन्हा जवळपास 65 खांबे उभी बाकी आहेत सर्व लाईन सुरळीत होण्यासाठी आणखीन 7 दिवस लागतील ” अस विज वितरण कंपनीचे कंत्राटदार विजय मुंढे यांनी सांगितले .

Leave a Comment