आणि बसंती मुलाच्या प्रेताजवळ ठिय्या मांडून बसली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरबा, छत्तीसगड | वीजेचा झटका लागून बुधवारी एका हत्तीचा मृत्यू झाला. छत्तीसगड मधील कोरबा जंगल परिसरात सदर प्रकार घडला. वीजेच्या झटक्यात मरण पावलेल्या हत्तीचे नाव वीरू असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मादी हत्ती बसंती तडपडून मेलेल्या वीरुला पाहून बैचन झाली आणि तिने प्रेताजवळ ठिय्या मांडला.

हाती आलेल्या माहीतीनुसार, हत्ती वीरु आणि त्याची मादी आई बसंती अन्नाच्या शोधात जंगलातून भटकत भटकत माणवी वस्तीत आले. यावेळी एका गावात या हत्तींनी चांगलाच धुडघूस घातला. गर्दी पाहून हत्ती सैरभैर झाले आणि त्यांनी काही घरांवर हल्ला चढवला. यामधे वीजेचा झटका लागून वीरु या हत्तीचा मृत्यू झाला आणि तो खाली कोसळला. तडपडणार्या वीरुला पाहून मादी हत्ती बेचैन झाली. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सदरील प्रकार घडला. आपला मुलगा वीरु उठत नाही हे पाहून मादी बसंती ने काही वेळा करता रौद्ररुप धारण केले होते. यानंतर मादी हत्ती सुमारे १५ तास वीरुच्या प्रेताजवळ ठिय्या मांडून बसली होती. प्रेताजवळ येणाऱ्या गावकर्यांवर तसेच वनअधिकाऱ्यांवर बसंती धाऊन गेली. नंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी मादी हत्तीला शांत केले आणि मृत हत्तीचे प्रेत पुढील प्रक्रीयेकरता दुसऱ्या ठिकाणी हलवले. सदरील घटनेची माहिती मिळताच कोरबा स्थानिक आमदार तसेच जिल्हाधिकारी व वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत वीरुने प्राण सोडला होता.

मानवी वस्तीत जंगली श्वापदांचा वावर मागील काही दिवसांत वाढला आहे. माणसाने जंगलावर केलेल्या अतिक्रमणाचा हा परिणाम आहे. अन्नाच्या शोधात हत्ती, बिबटे मानवी वस्तीत येतात आणि त्यामुळे नागरिकांकडून बऱ्याचदा त्यांना हानी पोहोचते. वनखात्याने यात लक्ष घालून वन्यप्राण्यांना मानवी वस्तीत येण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर प्रणीही जीव आहे. त्यांनाही आपल्यासारखा जगण्याचा अधिकार आहे हे आपण ध्यानात घेतले पाहीजे.

Leave a Comment