जेव्हा हत्ती शिरतो भारतीय लष्कराच्या छावणीत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । जंगलातील प्राण्यांचे विविध आणि मजेशीर व्हिडिओ कायम सोशल मीडियावर चांगलेच चर्चेमध्ये असतात. यामुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन देखील होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमधील हसीमारा येथील लष्करी छावणीच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरल्याची घटना समोर आली आहे. कॅन्टीनमधील डायनिंग हॉलमध्ये हत्ती सोंड हलवत शिरतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती पुढे चालत जाताना वाटेत येणाऱ्या खुर्च्या आणि टेबल सोंडेने उचलून इकडे तिकडे फेकताना दिसत आहे.

हा हत्ती कॅन्टीनमध्ये शिरल्याने कर्चमाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकजण कपाटांमागे लपले तर काहींनी या हत्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अंड्याची कॅरेट, डब्बे वाजवून हत्तीला कॅन्टीनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर्माचारी करत होते. मात्र कशाचाच परिणाम झाला नाही. अखेर एक कर्मचारी कपाटच्या मागून थेट जळतं लाकूड हातात घेऊन हत्ती समोर आला आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर हत्ती हळूहळू मागे होऊ लागला. त्या कर्चमाऱ्याने हत्तीचा पाठलाग करत त्याला जंगलामध्ये पळवून लावले.मात्र यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

पहा विडिओ-

जेव्हा भारतीय लष्कराच्या छावणीत हत्ती शिरतो !

Leave a Comment