जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ अब्जाधीश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बऱ्याच लोकांकडे अफाड संपत्ती आहे. पण तुम्हाला माहिती आहेत का, जगातील सर्वात जास्त संपत्ती असलेला अन श्रीमंत व्यक्ती कोण आहे. 10 मार्चला ब्लूमबर्ग संस्थेनेकडून नुकतीच 2025 ची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत . या यादीत आघाडीवर इलॉन मस्क (Elon Musk) यांचा समावेश आहे, तर अजून चार व्यक्ती दुसऱ्या , तिसऱ्या अशा क्रमांकावर आहेत. तर चला या पाच श्रीमंत व्यक्तीची आणि त्यांच्या संपत्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

इलॉन मस्क (330 अब्ज डॉलर) –

अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) हे ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स 2025 (Bloomberg Billionaires Index) च्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. मस्क यांच्या कंपन्यांमध्ये टेस्ला, स्पेसएक्स, स्टारलिंक, आणि द बोरिंग यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती 330 अब्ज डॉलर आहे, जी जगातील बहुतांश देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

मार्क झुकरबर्ग (221 अब्ज डॉलर) –

सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 221 अब्ज डॉलर आहे. झुकरबर्ग यांना 2010 मध्ये अमेरिकन नासिक टाइम्सने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून गौरविले होते.

जेफ बेझोस (220 अब्ज डॉलर) –

अमेझॉनच्या संस्थापक आणि अंतराळवीर जेफ बेझोस हे यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 220 अब्ज डॉलर आहे. 2018 मध्ये फोर्ब्सने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले होते.

बर्नार्ड अरनॉल्ट (184 अब्ज डॉलर) –

फ्रेंच व्यापारी आणि कला संग्राहक बर्नार्ड अरनॉल्ट हे लुई विशटॉन कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीचे लक्झरी वस्त्र उद्योगातील महत्त्वपूर्ण स्थान आहे. अरनॉल्ट यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य 184 अब्ज डॉलर आहे.

लॅरी एलिसन (176 अब्ज डॉलर) –

ओरॅकल कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीचे मूल्य 176 अब्ज डॉलर आहे . या लोकांची संपत्ती एकत्र केल्यास, ती अनेक देशांच्या एकत्रित आर्थिक उत्पादनापेक्षा जास्त आहे. हे लक्षात घेतल्यास, हा डाटा अत्यंत विचार करण्यासारखा आहे.