हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा एलन मस्क यांनी 13 ऑक्टोबर रोजी आपले मेगा स्टारशिप रॉकेट लाँच केलं . हे रॉकेट टेक्सासच्या दक्षिणने वरून सूर्योदयाच्या वेळी मेक्सिकोच्या सीमेपासून उडवण्यात आले. हे रॉकेट आतापर्यंतचे सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट मानले जात आहे. ते 400 फूट (121 मीटर) उंच असून त्याचा वेग 27000 किमी प्रति तास आहे .
रॉकेटला री-यूजेबिलिटी उपलब्ध
स्पेसएक्सने केलेली चाचणी खूपच धाडसी आणि अत्यंत यशस्वी मनाली जाते. कारण रॉकेटने कोणत्याही विस्फोटाशिवाय आपली पूर्ण उड्डाण प्रक्रिया पूर्ण केली. हे स्टारशिप रॉकेटचे महत्वाचे परीक्षण होते. याआधी जून 2024 मध्ये झालेल्या चाचणीत सुद्धा चांगले यश मिळाले होते . यामुळे भविष्यातील अंतराळ प्रवासासाठी मोठी प्रगती ठरेल ,असे म्हटले जात आहे. स्टारशिपच्या अनेक विशेषतांपैकी एक म्हणजे त्याची री-यूजेबिलिटी , म्हणजेच रॉकेट फेल झाल्यानंतरही त्याचा पुन्हा वापर करता येऊ शकतो . हे रॉकेट 150 टन वजन घेऊन जाऊ शकते आणि त्याची वेगमर्यादा सुमारे 27000 किमी प्रति तास आहे, ज्यामुळे ते अंतराळ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
नासाकडून स्टारशिप रॉकेट्सची ऑर्डर
मार्च 2024 मध्ये झालेल्या एका परीक्षणामध्ये, रॉकेट रीएंट्रीच्या वेळी त्याच्याशी संपर्क तुटला होता आणि रॉकेट यशस्वीरीत्या परत येऊ शकले नव्हते. त्यावेळी स्पेसएक्सने तांत्रिक समस्यांमुळे हे घडल्याचे सांगितले होते. तसेच दुसऱ्या परीक्षणात स्टेज सेपरेशनच्या अडचणींमुळेही ते यशस्वी होऊ शकले नव्हते. पण आता स्टारशिप रॉकेट 33 मीथेन-फ्यूल इंजिन्ससह सुसज्ज असून , त्यामुळे हे जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट बनले आहे. एलन मस्क यांचे या रॉकेटसाठी मोठे योगदान आहे. याचा वापर लोकांना चंद्र आणि मंगळावर पाठवण्यासाठी करू शकतात . नासा ने या दशकाच्या अखेरीस चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्यासाठी स्पेसएक्सकडून दोन स्टारशिप रॉकेट्सचे ऑर्डर दिले आहेत.