Elon Musk यांना भरावा लागणार 76 हजार कोटींचा टॅक्स – रिपोर्ट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

न्यूयॉर्क । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क नेहमीच चर्चेत असतात. या आठवड्यात अमेरिकेच्या प्रतिष्ठित टाईम मॅगझिनने त्यांना यावर्षीचा ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले. मात्र अमेरिकेच्या सिनेट सदस्या एलिझाबेथ वॉरन यांच्यासाठी त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. त्यांनी ट्विटरवर मस्क यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप केला. त्यांना पर्सन ऑफ द इयर ऐवजी टॅक्स रिगर म्हंटले पाहिजे, असे वॉरन म्हणाल्या. यानंतर वॉरन आणि एलन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यानंतर मस्क म्हणाले की,” या वर्षी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक टॅक्स देणारे बनणार आहे.”

एलन मस्कच्या या दाव्यांनंतर अमेरिकेची वृत्तसंस्था ब्लूमबर्गने अंदाज व्यक्त केला आहे की, या वर्षी त्यांना 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 76 हजार कोटींचा कर भरावा लागेल. असे झाल्यास ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त कर भरणारे ठरतील. मात्र अमेरिकेत अशा लोकांच्या नावांची अधिकृतपणे घोषणा केली जात नाही.

एलन मस्क किती टॅक्स भरणार?
हिशोब करायचा झाला तर 76 हजार कोटी रुपये हा त्यांच्या कमाईचा एक छोटासा भाग आहे. एलन मस्क सध्या नेट वर्थच्या बाबतीत जगात आघाडीवर आहेत. 255 अब्ज डॉलर्ससह ते पहिल्या क्रमांकावर आहेत. यावर्षी या आकडेवारीत 55 अब्जांची वाढ झाली आहे.

5 वर्षात 2300% ची विक्रमी वाढ
गेल्या महिन्यात, ट्विटरवर एक वोटिंग आयोजित करून, त्यांनी लोकांना विचारले की, त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या 10% शेअर्सची विक्री करावी का ?. टेस्लाच्या स्टॉकमध्ये गेल्या 5 वर्षांत 2300% ची विक्रमी वाढ झाली आहे. मस्कने यावेळी टेस्लाचे 9,34,091 शेअर्स 90.65 कोटींना विकले आहेत. याआधी त्यांनी इतकेच शेअर्स 96.3 कोटी डॉलर्सला विकले होते. त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी कंपनीचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्स मध्ये सातत्याने घसरण होत आहे.

कंपनीतून पगार घेत नाही
या वर्षी जूनमध्ये एका रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले होते की, मस्क त्यांच्या कमाईनुसार नगण्य टॅक्स भरतात. मस्कने सांगितले होते की,” ते त्यांच्या कंपनी स्पेसएक्स आणि टेस्ला कडून पगार घेत नाहीत आणि स्टॉकनुसार 53% टॅक्स देतात. पुढील वर्षी या टॅक्सचे दर वाढतील, असेही त्यांनी सांगितले होते. याच काळात यूएसमध्ये एक कायदा आला, ज्यानुसार सर्व शेअर्सची किंमत (ज्या दराने खरेदी केली होती) आणि शेअर्सची वास्तविक किंमत यातील फरकावर भांडवली नफ्याच्या 50 टक्के रक्कम टॅक्स म्हणून द्यावी द्यावी लागेल.

Leave a Comment