Elora waterfall | ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यभर जोरदार पाऊस कोसळला. परंतु त्यानंतर एक ते दोन आठवडे पावसाने चांगलीच विश्रांती घेतलेली होती. परंतु आता गेल्या चार-पाच दिवसापासून पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन करत महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. अगदी या दोन-तीन दिवसाच्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहताना दिसत आहे. आणि पुन्हा एकदा पर्यटकांची पावले हळूहळू निसर्गाकडे वळायला लागलेली आहेत. अनेक लोक हे लेण्यांमध्ये देखील जात आहे. खुलताबाद या परिसरात देखील अनेक धबधबे वाहायला लागलेले आहेत. मराठवाड्यात वेरूळचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी वेरूळचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे पर्यटक देखील हळूहळू पुन्हा एकदा निसर्गाकडे वळायला लागलेली दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि या डोंगरदर्यातील झरे, धबधबे वाहायला लागलेली आहेत. या ठिकाणी अनेक लोक खुलताबाद, दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ या ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत.
वेरूळचा धबधबा | Elora waterfall
गेल्या दोन-तीन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वेरूळचा धबधबा देखील मोठ्या प्रमाणात वाहायला लागलेला आहे. वेरूळच्या धबधब्याचे दर्शन घेणे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणी असते. अशातच आता शनिवार रविवारी अनेक पर्यटकांनी वेरूळचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे. परंतु या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे कारण या आधीच अनेक कड्यांवरून किंवा दरीमध्ये कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची तैनात देखील वाढवण्यात आलेली आहे.
श्रावण महिना सुरू झाल्यामुळे आता खुलताबादमधील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी देखील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहे. परंतु या पावसामुळे लोकांची तारांबळ उडताना पाहायला दिसत आहे. घृन्हेश्वराच्या मंदिरा येथे देखील खूप मोठी गर्दी दिसत आहे. त्यात शनिवार रविवार आल्याने पर्यटक आणि भावीक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.