दप्तर तपासणीत : सातारा तालुक्यातील “या” ग्रामपंचायतीत 17 लाख 66 हजार 955 रूपयांचा अपहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | ग्रामपंचायत खोजेवाडी यांचेकडून गावातील विकासकामांमध्ये सुमारे 17 लाख 66 हजार 955 रुपये इतक्या रकमेचा अपहार झाला आहे. अपशिंगे भागातील ग्रामपंचायत खोजेवाडी (ता. सातारा) येथे गावातील विविध विकासकामांच्या पुर्तते दरम्यान संभावित ग्रामसेवक तसेच सरपंच, उपसरपंच आणि नियोजित सदस्यांकडून मोठ्या रकमेचा अपहार झाला असल्याचे चित्र विस्तार अधिकारी यांचे दप्तरी तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

याबाबत गटविकास अधिकारी सातारा पंचायत समिती यांच्या अहवालानुसार आणि अपशिंगे मि. गणातील पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे यांचेकडून विरोधी सदस्यांसोबत ग्रामपंचायत खोजेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रामसेवक बी. डी. बोभाटे यांचे बदली नंतर विस्तार अधिकारी यांचे ग्रामपंचायत खोजेवाडी (ता.सातारा) येथील दि. 11 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यानच्या दप्तरी तपासणी कामकाजात तत्कालीन ग्रामसेवक बी. डी. बोभाटे यांचे 17 जून 2019 ते 11 ऑगस्ट 2021 या सदर कार्यकाळात बऱ्याच नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे. तसेच 14 वा. वित्त आयोगातून करण्यात आलेल्या प्रस्तावित कामकाजात 6 लाख 71 हजार 163 रुपये रकमेची नियमानुसार कोटेशन न मागविता खरेदी प्रक्रिया केलेली दिसून आली आहे.

पाणी पुरवठा निधी कामकाजात प्रमाणक रुपये 2 लाख 430 इतक्या रकमेचा संशयित अपहार केल्याचे चित्र समोर स्पष्ट झाले आहे. 14 वा वित्त आयोग सन 2018-19 तसेच सन 2019-20 मध्ये मंजूर जीपीडीपी आराखड्यानुसार 25 टक्के संभावित रक्कम आरोग्य, शिक्षण, उपजीविका या बाबींवर खर्च करणे अपेक्षित असतानाही इतर मंजूर कामांवर खर्च केल्याचे दिसून आले आहे. तसेच सदर 14 वा वित्त आयोगातील सन 2018-19 मधील मंजूर झालेल्या 9 कामांपैकी 7 कामांवर खर्च झालेला दिसत असून उर्वरित 25 टक्के रक्कम अपंग साहित्य पुरवणे, मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, आरोग्य शिबीर घेणे या बाबींवर खर्च केल्याचे दिसत नाही.

तसेच सदर वित्त आयोगातील सन 2018-19 व 2019-20 मधील इतर बांधकामाचे कामावर खर्च केलेला असून त्यांचे मूल्यांकन दाखले दाखवणे आवश्यक असतानाही तशे घेतले नसल्याचे दिसून येत आहे. त्यातील खरेदी केलेल्या वस्तूंची व साहित्याची दरपत्रके न मागविता खरेदी प्रक्रिया राबविली असून ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 15 साठा नोंदवहीत नोंदी घेतलेल्या नाहीत. सन 2019-20 मधील जीपीडीपी मंजूर झालेल्या 10 पैकी 5 कामे केली असून उर्वरीत 5 कामे केलेली नाहीत. तसेच आरोग्य अपंग साहित्य पुरवणे, मुलींच्या जन्माचे स्वागत, शिक्षण, पाणी शुद्धीकरण, उपजीविका सूक्ष्म सिंचनास प्रोत्साहन देणे याबाबी तसेच इतर बाबी सुतार नेट टाकी बांधकाम ही कामे केलेली नसल्याचे दिसून आले आहे.

रोपे खरेदीबाबत रक्कम रुपये 22 हजार या रक्कमेचा खर्च ग्रामनिधी खात्यातून केला असून त्याचे नोंदी नमुना नंबर 33 नोंदवहीत केलेल्या नाहीत. ग्रामीण पाणी पुरवठा नळ कनेक्शन डिपॉझिट मुदत ठेव पावती रुपये रक्कम सुमारे 3 लाख 92 हजार 232 इतक्या रक्कमेची जिल्हा मध्यवर्ती सह. बँक शाखा अपशींगे (मि) या खात्यावरील स्वतंत्र रक्कम व्याज रुपये 62 हजार 365 आणि रक्कम रुपये 4 लाख 54 हजार 597 इतकी रक्कम डिपॉझिट ग्रामपंचायतीने बेकायदेशीर रित्या खर्च केलेली असून सदर बाब नियमबाह्य असून महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा 1997 चे कलम 6 (1) (2) अन्वये सदर रक्कमेची राज्यशासन अथवा केंद्र शासनाच्या ठेवीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असताना तशी कार्यवाही केलेली दिसून येत नसल्याने नमुना 17 अद्ययावत नाही. त्यामुळे सदर डिपॉझिट रक्कमेचे चालू वर्षाचे ताळमेळ घेऊन नियमानुसार फेर स्वतंत्र गुंतवणूक करणेत यावी. तोपर्यंत सदर शक अपेक्षाधीन ठेवण्यात येत आहे. रोखीने खर्च ग्राम पाणी पुरवठा निधी सन 2019-20 प्रमाणक रक्कम रुपये 15 हजार 880 रुपये तसेच सन 2020-21 मधील काही प्रमाणक नंबर मधील रक्कम रुपये 37 हजार 813 रुपये सन 2021-22 मधील रक्कम 1 हजार 100 रूपये अशी एकूण रक्कम रुपये 54 हजार 793 हजार ग्राम निधीतून रोखीने खर्च सन 2019-20 प्रमाणक नंबर मधील रक्कम रुपये 8 हजार 209 तसेच रक्कम रुपये 1 हजार 500 अशी सर्व मिळून एकूण रक्कम रुपये 9 हजार 709 इतका नियमबाह्य खर्च केलेला आढळून आलेला आहे.

मूल्यांकनाशिवाय खर्च ग्राम पाणी पुरवठा निधी पाणी पुरवठा लिकेज काढणे सन 2019-20 रक्कम रुपये 20 हजार तसेच सन 2020-21 रक्कम रुपये 64 हजार 793, सन 2021-22 रक्कम रुपये 1 लाख 2 हजार 820 रुपये, ग्राम निधी सन 2019-20 रक्कम रुपये 24 हजार 750, सन 2020-21 मधील 46 हजार 400, सन 2021-22 मधील रक्कम रुपये 57 हजार 500 इतका खर्च कामाचे अंदाजपत्रके न घेता निविदा प्रक्रिया न राबविता मूल्यांकना शिवाय केलेला आहे. वरील प्रमाणे कामकाज करताना ग्रामपंचायत निधीचा खर्च करताना सर्व मिळून रक्कम रुपये अक्षरी 17 लाख 66 हजार 955 रुपये इतक्या आर्थिक व वित्तीय अनियमिततेस संशयित अपहारास ग्रामपंचायत खोजेवाडी येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक बी. डी. बोभाटे हे सर्वस्वी जबाबदार आहेत. तरी सदर बाबींचा खुलासा 7 दिवसात पुर्ततेसह सादर करावा अन्यथा खुलासा विहित मुदतीत अगर समाधानकारक न आलेस आपले म्हणणे काही नाही असे समजून संबधीत व्यक्तींवर गटविकास अधिकारी सातारा यांचे मार्फत खाते कारवाई प्रस्तावित करण्यात येईल ? याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सरपंच पदाचा राजीनामा देवून अपहार रक्कम वर्ग करावी

ग्रामपंचायत खोजेवाडी ता.सातारा येथील विद्यमान ग्रामसेवक बी.डी.बोभाटे सरपंच अरुणा जाधव, उपसरपंच राहुल डांगे तसेच सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य यांनी मनमानी कारभार करत इतक्या रकमेचा अपहार केलेला आहे. तसेच गावातील पंधरा बचत गटातून प्रेरक म्हणून काम करताना सरपंच यांनी त्यामध्येही लाखोंचा अपहार केलेला आहे. तर यामुळे सरपंच यांनी पदाचा राजीनामा देऊन अपहार केलेली सर्व रक्कम दिलेल्या मुदतीत ग्रामपंचायत खाते वर्ग करावी अन्यथा सर्व ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याचे पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे यांनी सांगितले.

Leave a Comment