आणीबाणी भारतीय लोकशाहीला लागलेला काळा डाग : नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली
२५ जून १९७५ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात राष्ट्रपतीच्या मार्फत आणीबाणीची घोषणा केली. पुढील दोन वर्ष देशात आणीबाणीचा काळ राहिला. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये डांबले गेले. या दुःखदायक राजकीय प्रसंगावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना एका व्हिडीओमधून व्यक्त केल्या आहेत. तो व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

 

 

लोकशाहीला लागलेला काळा डाग म्हणून आणीबाणीच्या पर्वाकडे बघतले जाते. या पर्वात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. अनेक नेत्यांना काळकोठडीत बंदिवान केले असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीला हुकूमशाहीचा प्रकार म्हणून संबोधित केले आहे.

तर अमित शहा यांनी देखील या संदर्भात ट्विट करून आपला निषेद नोंदवला आहे. सन १९७५ मध्ये आजच्याच दिवशी आपल्या राजकीय स्वर्थासाठी देशाच्या लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. देशवासीयांकडून त्यांचे मुलभूत अधिकार काढून घेण्यात आले होते. वर्तमानपत्रांच्या कार्यालयांनाही टाळे लावण्यात आले होते. दरम्यान, लाखो राष्ट्रभक्तांनी लोकशाहीला पुनर्पस्थापित करण्यासाठी अनेक यातना सहन केल्या. त्या सर्व सैनिकांना मी नमन करतो.

Leave a Comment