कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
विट्यातील मोठ्या आव्हानात्मक घरफोडीचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आलेलं आहे. विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

२४ जुलै रोजी सिद्धाप्पा याने बंगल्यात चोरी केली होती. याबाबत जयदीप बाबर यांनी चोरीबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञातांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी डीबी पथकासह कर्मचाऱ्यांना याबाबत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेचा सखोल तपास करीत असताना फिर्यादीकडे काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा परागंदा झाल्याने त्याचा शोध घेत असताना तो १६ ऑक्टोबरला सोन्याळमध्ये आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३२ लाख ८९ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हा मुद्देमाल वाळूज येथून जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मालापैकी ६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल त्याने चडचण, सांगली, विटा, लेंगरे येथील बँक व सराफाकडे गहाण ठेवला आहे. उर्वरित मुद्देमाल लवकरच जप्त करण्यात येणार आहे. आरोपीने हे दागिने जमिनीत पुरून ठेवले होते. विटा पोलीस ठाण्याच्या पोलिसानी अत्यंत चांगली कामगिरी केली. त्या प्रत्येकाला १० हजाराचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगितल.

Leave a Comment