Employees Deposit Linked Insurance कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही योजना कामगार वर्गासाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे. या ईपीएफओ योजनेअंतर्गत खातेधारकांना जीवन विमा देखील मिळतो. या खातेधारकांना जास्तीत जास्त 7 लाखापर्यंत विमा मिळू शकतो. या योजनेला एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स असे म्हणतात. आता या योजनेचा ईपीएफ खातेधारकांना नक्की काय फायदा होतो? त्याचप्रमाणे ही योजना काय आहे? हे आपण जाणून घेऊया.
एम्पलोयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स काय आहे? | Employees Deposit Linked Insurance
ईपीएफओ अंतर्गत एम्पलोयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजनेची सुरुवात 1976 साली सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत ईपीएफमध्ये खाते असणाऱ्या सदस्याचा काही कारणास्तव मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी. यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एकदम मोफत विमा दिला जातो. त्याचप्रमाणे कंपनीकडून देखील योगदान दिले जाते.
विम्याची रक्कम कशी ठरवली जाते ?
या विम्याची रक्कम गेल्या 12 महिन्यांचा बेसिक पगार आणि डीए यांच्यावर निश्चित केली जाते. या विम्याचा प्लॅन करायचा असेल, तर क्लेम शेवटच्या पगारातील बेसिक सॅलरी यांच्या 35 पट असेल त्याचप्रमाणे क्लेम करण्यालाही 1 लाख 75 हजार रुपये बोनस म्हणून मिळतील.
जोपर्यंत नोकरी तोपर्यंत विमा | Employees Deposit Linked Insurance
या योजनेअंतर्गत सदस्याची जोपर्यंत नोकरी आहे. तोपर्यंत त्याला हा विमा दिला जाणार आहे. नोकरी गेल्यानंतर ईपीएफओ सदस्यांचे कुटुंब नॉमिनी या विम्यासाठी क्लेम करू शकत नाही. एखाद्या मेंबर सलग बारा महिने नोकरी करत असेल आणि त्याचा मृत्यू नंतर नॉमिनीला कमीत कमी अडीच लाख रुपये मिळू शकता.
नॉमिन नसेल तर काय करणार ?
नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांचा अपघात दुर्घटना किंवा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याला या विमा योजनेसाठी क्लेम करता येतो. परंतु यासाठी तर त्या व्यक्तीने नॉमिनी नोंदवला नसेल, तर मृत कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला, अविवाहित मुली , अल्पवयीन मुले यांना क्लेम मिळतो.
क्लेम कसा करायचा ?
इपीएफओ या खातेधारकाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनी किंवा उत्तराधिकाऱ्याला विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येतो. यासाठी नॉमिनीचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. जर नॉमिनीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल, तर त्याचे पालक यासाठी क्लेम करू शकतात. यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र सक्सेशन सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे लागतात.