‘या’ टेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाला दीड कोटी रुपयांपर्यंत बोनस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा सामना करणार्‍या Apple Inc. ने आता ब्रेन ड्रेन टाळण्यासाठी आपल्या काही कर्मचार्‍यांना स्पेशल स्टॉक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजीनियरिंग डिपार्टमेंट मधील काही कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांपर्यंतचा बोनस देत आहे. कर्मचाऱ्यांना हा बोनस कंपनीच्या शेअर्सच्या स्वरूपात दिला जात आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये देखील Apple ने आपल्या काही कर्मचारी गटांना स्पेशल स्टॉक बोनस दिला होता.

या बोनसची रचना अशा प्रकारे केली जाते की, कर्मचारी अनेक वर्षे कंपनी सोडत नाही. कारण, बोनस शेअर्सच्या स्वरूपात दिला जात असल्याने भविष्यात त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या शेअर्सचे दर जसजसे वाढतील, तसाच फायदा कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. Apple Inc. चे शेअर्स गेल्या 12 महिन्यांत 40 टक्क्यांनी वाढले आहेत. Apple गेल्या काही काळापासून कर्मचार्‍यांच्या कमतरतेशी झुंजत आहे. फेसबुकच्या मूळ कंपनी मेटाने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया जलद केल्याने Apple कंपनीला आपले कर्मचारी सोडून जाण्याची भीती देखील वाटते आहे.

डिसेंबरमध्येही दिला होता बोनस
LiveMint.com च्या रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही Apple ने डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना स्पेशल स्टॉक आधारित बोनस दिला होता. त्यानंतर $180,000 पर्यंतचा बोनस दिला गेला. डिसेंबरमध्ये कंपनीच्या हार्डवेअर टेक्नॉलॉजीज ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता. ज्या टीमला बोनस देण्यात आला त्यांनी Apple ची कस्टम चिप डिझाईन केली आणि ही आता टीम भविष्यातील व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हेडसेट तयार करण्यात गुंतलेली होती.

कर्मचाऱ्यांची कमतरता आहे
कंपनीला चिप डिझाइन ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. दुसरीकडे, फेसबुकची मूळ कंपनी मेटा (META) ने कर्मचार्‍यांची भरती तीव्र केली आहे. या कर्मचाऱ्यांना मेटाव्हर्सवर काम करण्यासाठी नियुक्त केले जात आहे.

यावेळी डिसेंबरमध्ये दिलेल्या बोनसपेक्षा कमी कर्मचाऱ्यांना स्पेशल बोनस देण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागप्रमुखांनी बोनस देण्याच्या निर्णयाची जाणीव करून दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, Apple विशिष्ट वार्षिक बोनस ऑफर करत आहे आणि कंपेनसेशन एडजस्‍टमेंट करत आहे.

Leave a Comment