एसटीचा तिढा कायम ! कर्मचारी संपावर तर महामंडळ निलंबनावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून काल औरंगाबाद विभागातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात सिडको बस स्थानकातील पाच आणि पैठण आकारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून तिसऱ्या दिवशी लढा सुरूच राहिला. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बस स्थानक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा तसेच विभाग नियंत्रक कार्यालयासमोर कर्मचारी बसून होते. मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही दाखल झाले होते‌. संपादरम्यान मंगळवारी बस मधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक वाहकांच्या संपकरी कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात येत होता. अधिकाऱ्यांनी हटकल्याने संपकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच पुष्पहार घातला. त्यानंतर सिडको बस स्थानकातील पाच कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या कर्मचाऱ्यांचे निलंबन बुधवारी मागे घेणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. मात्र, काल सायंकाळी आणखी दहा जणांचे निलंबित करण्यात आले. यामध्ये सिडको बस स्थानकातील आणखी पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत एकूण पंधरा कर्मचाऱ्यांचे निलंबन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सूड भावनेतून कारवाई केली जात असल्याचे सांगत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

Leave a Comment