बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । बँक खाजगीकरण विरोधात युनायटेड कोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी संपास जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार कर्मचारी काम बंद करून या आंदोलनात सहभागी झाले. संपामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील सुमारे आठशे कोटींचे व्यवहार ठप्प झाले. युनायटेड कोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटने अंतर्गत, सांगली युनिट तर्फे आज बँक ऑफ इंडिया, पटेलचौक शाखे समोर, बँक खाजगीकरण विरोधात पुकारलेल्या देश व्यापी संप पळून जोरदार निदर्शने करण्यात आली.

बँकांच्या खाजगी करणाच्या प्रक्रियेला कडाडून विरोध करण्यात आला. खाजगीकरण झाल्यास सामान्य जनतेला बँकिंग सेवा पासून मुकावे लागणार आहे. संपूर्ण देशातील अर्धिक घडी विसकटून देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती असलेले छापीलपत्रकाचे वाटप करण्यात आले. यु एफ बी यु अंतर्गत हा देशव्यापी संप दोन दिवसांचा आहे. याप्रसंगी लक्ष्मीकांत कट्टी, चौगुले, देशपांडे, बँक ऑफ बडोदाचे किमया उकिडवे, भाग्यश्री वलकुंडे बँक ऑफ महाराष्ट्राचे उमेश खोत, सुदर्शन सिंग व सालेम नदाफ यानी मार्गदर्शन केले.

बँक कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी लक्ष्मीकांत कट्टी,अरविंद चौगुले व बाबासो कोरुचे, युनियन बँकेचे अमोल खोत, संजय जोशी, बँक ऑफ इंडिया अन्नात बिळगी व संजय देशपांडे यांनी केले. शुक्रवारी मिरज येथील भारती स्टेट बँके समोर सकाळी ठीक 10 वाजता होणार आहेत.

Leave a Comment