श्रीनगर । जम्मू आणि काश्मीरमधील सोपोरमध्ये सोपोर पोलिस, २२ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे केलेल्या कारवाईत २ दहशतवादी ठार झाले आहेत. ही चकमक सुरूच असून या कारवाई दरम्यान या भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांलना मिळाली आहे. सोपोर पोलिस, २२ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Encounter underway in Hardshiva area of Sopore. Police and security forces are on the job: Jammu & Kashmir Police (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/WcHLBgDA55
— ANI (@ANI) June 25, 2020
दहशतवाद्यांना ठार करण्याचा सिलसिला सुरूच
या पूर्वी २३ जून या दिवशी पुलवामा येथील बांदजू भागात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहिमेअंतर्गत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या चकमकीदरम्यान सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. या चकमकीत २ दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर परिमंडळाचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली होती. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बांदजूमध्ये शोध मोहीम हाती घेतली होती.
तसेच २१ जून रोजीही जम्मू काश्मीरच्या कुलगाम आणि श्रीनगरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह एकूण ४ दहशतवादी ठार झाले होते. गेल्या शनिवारी संध्याकाळी देखील कुलगाममध्ये सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत १ दहशतवादी मारला गेला. तैयब वहीद उर्फ इम्रान भाई अशी या मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आली. तो गाजी बाबा या नावानेही ओळखला जात होता. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”