व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATSमधून बदली

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात विविध घडामोडी घडत आहेत. मग त्यामध्ये सचिन वाझे यांना झालेली अटक, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर खंडणीचे केलेले आरोप यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या महासंचालकपदी संजय पांडे नियुक्ती केली होती.

यानंतर आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची दहशतवादविरोधी पथकातून बदली करण्यात आली. दहशतवादविरोधी पथकातून बदली केल्यानंतर त्यांची गोंदिया जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

प्रशासकीय कारणास्तव दया नायक यांची बदली करण्यात आली असे बोलले जात आहे. ATS मध्ये असताना दया नायक यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात मोठी भूमिका पार पाडली होती.