हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्माएनआयएच्या रडारवर होते. लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
संतोष शेलार, यादव यांनी चौकशीदरम्यान प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले होते. आज सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आले आहे.
प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, यावेळी प्रदीप शर्मा यांच्या अटकेची शक्यता वर्तवली गेली असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. पण गुरुवारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर दुपारी एनआयएनं त्यांना अखेर अटक केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.