हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डायनासोरच्या संपुष्टीनंतर इतर अनेक प्राणी, पृथ्वीवरून नष्ट झाले आहेत. आणि आता मानवावर हीच वेळ येणार आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात हे भाकीत करण्यात आले आहे. पृथीवरून मानव प्रजाती कशी नष्ट होणार? त्यांसाठी कोणकोणती कारणे जबाबदार राहतील याबाबतची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. चला जाणून घेऊयात.
तापमान वाढीमुळे मानवास धोका
मानव जातीने निर्माण केलेल्या प्रगती सदृश्य गोष्टी जसे की, कारखाने, विविध स्वरूपातील उद्योग, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर चालणारी वाहने , मोठे रस्ते या सर्वासाठी लागणारी जागा आणि त्यासाठी होणारी वृक्ष्याची मोठ्या प्रमाणात होणारी तोड ही सर्व कारणे मानव जातीसाठी धोका निर्माण करत आहेत. माणसाने आपल्या प्रगतीसाठी केलेल्या ह्या गोष्टीतुन मोठ्या प्रमाणात दूषित वायूचे प्रमाण पृथ्वीवर वाढत चालले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ज्यांना हरित वायू म्हणून ओळखले जाते. जे की पृथ्वीच्या तापमान वाढीत सर्वात मोठा वाटा उचलतात. ज्यांच्या वातावरणातील वाढीमुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ह्या हरितगृह वायुचे प्रमाण कमी करण्यासाठी जगातील सर्वच भागात होत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत.
250 दशलक्ष वर्षात पृथ्वीचे तापमान मानवजातीला असहनीय असेल – शास्त्रज्ञ
शास्त्रज्ञानाच्या मते, पुढील 250 दशलक्ष वर्षात पृथ्वीचे तापमान हे वाढत वाढत जाऊन 40° ते 70 ° पर्यंत जाऊ शकते. या तापमानात माणसाला जगणे अश्यक्य होऊन जाईल. त्याच बरोबरीने पृथ्वीवरील अन्य सस्तन प्राणी देखील ह्या तापमान वाढीत तग धरू शकणार नाहीत. त्यामुळे ते देखील मानवी प्रजातीसोबत संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. जे सजीव तापमान वाढीत जगण्यासाठी स्वतःला सक्षम करतील तेच सजीव प्रामुख्याने ह्या काळात पृथ्वीवर जगतील. जे सजीव स्वतःला थंड ठेवण्यात सक्षम राहतील तेच इथे टिकतील.
पृथ्वीवर उत्तर व दक्षिण ध्रुवावरही तापमान वाढ
पृथ्वीवर उत्तर व दक्षिण ध्रुवावर असलेले तापमान देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. ज्यामुळे ह्या भागात असलेला बर्फ वितळून पृथ्वीवरील बहूतांश भाग हा पाण्याखाली जाईल. त्यामुळे पृथ्वीचा फक्त ध्रुवावरील म्हणजेच 8 ते 10% भागच राहण्यासाठी योग्य असेल. ज्याच्या माध्यमातून पृथ्वीवर सजीवसृष्टी अस्तित्वात राहू शकेल असे शाश्त्रज्ञ सांगतात
पृथ्वीचा नाश रोखण्यासाठी 195 देश येणार एकत्र
पॅरिस करारानुसार पृथ्वीचे तापमान 1.5 अंश पेक्षा अधिक वाढू न देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या करारावर जगभरातील 195 देशानी सह्या केलेल्या असून त्या अंतर्गत हरितगृह वायूचे आपआपल्या देशातील प्रमाण कमी करून देशात वातावरणीय बदलावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.