अतिथीगृहात रात्रभर चावले डास; मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी दिले इंनजीनियरवर कारवाईचे आदेश

भोपाळ । काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात बस कालव्यात कोसळून ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी सीधीमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांचा मुक्काम शासकीय अतिथीगृहात होता. यावेळी अतिथीगृहामध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे शिवराज सिंह चौहान यांना रात्रभर डास चावले. याशिवाय टाकीमधून पाणी ओव्हर फ्लो होत होतं. आता या प्रकरणी प्रशासनानं कारवाई केली आहे. (MP CM Shivraj Singh Chouhan)

‘मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान १७ फेब्रुवारीला एक विशिष्ट अतिथी सीधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सर्किट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी थांबले. याची पूर्वसूचना सर्किट हाऊसचे प्रभारी बाबूलाल गुप्ता यांना देण्यात आली होती. मात्र सर्किट हाऊस आणि परिसरात अस्वच्छता होती,’ असं आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुप्ता यांना निलंबित करण्यात आलं आहे. अशाप्रकारचा कारवाईचा आदेश रिवा विभागाच्या आयुक्तांनी जारी केला आहे.

‘सर्किट हाऊसमधील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत होती. खोलीत डास असल्याची तक्रारदेखील प्राप्त झाली आहे. यातून अतिथीगृहाची देखभाल व्यवस्थित झाली नसल्याचं स्पष्ट होतं. गुप्ता यांनी त्यांचं काम नीट न केलं नाही. त्यामुळे विशिष्ट अतिथींना त्रास झाला. गुप्ता यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा डागाळली. हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. त्यामुळे त्यांना निलंबित केलं जात आहे,’ असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.