अमरावतीत माॅलवरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी। अमरावती येथील नेक्ट ‍लेवल नेक्सा माॅलच्या माळ्यावरून ऊडी मारत एका २२ वर्षिय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. रुपाली सुरेश गुंडाळे असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. रुपाली शिराळा येथील रहिवाशी होती.

रुपाली ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. शहरातील बियाणी चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉल हा लोकांची वर्दळ असणारा मॉल आहे. रुपालीने या मॉलच्या पाचव्या माळ्यावरून रूढी घेतली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रुपालीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.पदवी परीक्षेत नापास झाल्याने, आलेल्या नैराश्यामुळं तीने ही आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, रुपाली मॉलमध्ये कोणासोबत आली होती? आणि तीने मॉलमध्येच येऊन का आत्महत्या केली? हे अजून स्पष्ट झालले नाही आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर इथं थोड्याच वेळात मोठी गर्दी जमली होती.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पंचनामा पोलीसांनी केला असून पुढील तपास अजून सूरू आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment