इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज Ben Stokesची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंडचा सुपरस्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stoke) वनडे क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. स्टोक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वनडे फॉर्मेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवारी 19 जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा पहिला वनडे सामना त्याच्या वनडे करिअर मधील शेवटचा सामना असणार आहे. मंगळवारपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 3 वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना डरहम येथे खेळला जाणार आहे. स्टोक्स (Ben Stoke) आपल्या होम ग्राऊंडवरच आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये महत्त्वपूर्ण योगदान
वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी बेन स्टोक्सने (Ben Stoke) वनडे क्रिकेटला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. बेन स्टोक्स इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. तीन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात स्टोक्स (Ben Stoke) लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये 84 धावांची नाबाद इनिंग खेळला होता. हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. सुपर ओव्हर मध्ये सुद्धा मॅच टाय झाली. पण त्यावेळी जास्त चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले होते. यावेळी बेन स्टोक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

बेन स्टोक्सची कारकीर्द
फलंदाजी आणि गोलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बेन स्टोक्सने (Ben Stoke) 2011 साली वयाच्या 20 व्या वर्षी 2011 साली आयर्लंड विरुद्ध वनडे मध्ये डेब्यु केला होता. तो (Ben Stoke) इंग्लंडकडून आतपर्यंत 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 2919 धावा केल्या. यामध्ये 3 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी त्याची सरासरी 39 पेक्षा जास्त आणि स्ट्राइक रेट 95 पेक्षा जास्त होता. तसेच त्याने 74 विकेटसुद्धा घेतल्या आहेत. बेन स्टोक्स वनडे मधून निवृत्त झाला असला, तरी तो त्याचं आता पूर्ण लक्ष कसोटी आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कप वर देणार आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment