Wednesday, March 29, 2023

इंग्लंडची दिग्गज क्रिकेटपटू लॉरा मार्शने घेतली निवृत्ती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची खेळाडू लॉरा मार्शने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली आहे. लॉरा मार्शने इंग्लंडकडून नऊ कसोटी, 103 एकदिवसीय आणि 67 टी -20 सामने खेळले आहेत. या कालावधीत, 33 वर्षीय मार्शने तिन्ही स्वरूपात 217 बळी घेतले.

इंग्लंडच्या संघातून वगळल्यानंतर लॉरा मार्श गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली होता. पण आता मात्र तीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे द हंड्रेड क्रिकेट लीगला स्थगिती मिळणे. लॉरा मार्श क्रिकेटचे नवे स्वरूप खेळायला तयार होती, पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

लॉरा मार्शने ट्विटरवर ही घोषणा केली की मी क्रिकेटच्या सर्व प्रारूपांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी द हंड्रेडची स्पर्धा रद्द झाल्यानंतर मला असे वाटते की शूज काढून टाकण्याची ही योग्य वेळ आहे. ज्या संघांचे मी प्रतिनिधित्व केले त्या सर्व संघांचे आणि संस्थांचे मी आभार मानू इच्छितो.