‘१ बॉलमध्ये १२ रनचा नियम करा’ ‘या’ दिग्ग्ज क्रिकेटपटूची ICCकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटमधील एखाद्या मॅचवर आपली प्रतिक्रिया देत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जेव्हा मालिका सुरु असते तेव्हा तो त्याच्या ट्विटमुळे अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा हिंदीमधून देखील ट्विट केले आहे.टी – २० क्रिकेट हा केव्हिन पीटरसनचा आवडता प्रकार आहे. तो नेहमी आपले मत मांडत असतो.

https://twitter.com/KP24/status/1386916604080910336

केव्हिन पीटरसनने आयपीएल स्पर्धेत स्लो ओव्हर रेटमुळे काही कॅप्टनना दंड झाल्यानंतर आनंद व्यक्त केला होता. केव्हिन पीटरसनने क्रिकेटच्या या सर्वात जलद प्रकारात कोणताही संथपणा नको, अशी भूमिका मांडली होती. केव्हिन पीटरसनने क्रिकेटचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल समोर एक प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये त्याने टी – २० क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाने 100 मीटर पेक्षा लांब सिक्स मारला तर त्याला ६ पैकी १२ रन मिळावेत, अशी मागणी केली आहे. या प्रस्तावाबरोबरच त्याने त्याचे फायदेसुद्धा ट्विट करून सांगितले आहेत.

https://twitter.com/KP24/status/1386963093859684354

काय आहेत फायदे?
केव्हिन पीटरसनच्या मते जर एका बॉलवर १२ रन मिळणार असतील तर कोणतीही टी- २० मॅच शेवटपर्यंत संपणार नाही. त्यामुळे सामन्यांमधील थरार शेवटपर्यंत राहील. तसेच या नियमाचा फायदा ब्रॉडकास्टर्सनासुद्धा होणार आहे. यामुळे महसूल निर्मितीचा नवा मार्ग उपलब्ध होईल,” असा दावा पीटरसनकडून करण्यात आला आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत हा नियम लागू करावा अशी मागणी पीटरसनकडून करण्यात आली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये आयसीसीला टॅग केले आहे. केव्हिन पीटरसन याने केलेली मागणी जर मान्य झाली तर नक्कीच क्रिकेटचे स्वरुप बदलेल.

Leave a Comment