Wednesday, February 1, 2023

औरंगाबादच्या उधोजक महिलांना मिळणार मसिआ कडून प्रोत्साहन

- Advertisement -

औरंगाबाद : उद्योजक महिलांना औद्योगिक क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे. त्यांना नवनवीन संधी शोधता याव्यात तसेच प्रशासकीय पातळीवरती उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी महिला उद्योजकांचा वेगळा सेल मसिआ तर्फे स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी वाळूज येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील औद्योगीक क्षेत्रात सध्या नविन उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. परंतु त्यामध्ये आजही महिला उद्योजकांचा म्हणावा तसा सहभाग नाही. महिला लघु उद्योजकांना या विंगच्या अंतर्गत महिला उद्योजकांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण तसेच महिला विषयीच्या औद्योगिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती मिळण्यासाठी परिसंवाद, मोठ्या यशस्वी उद्योजक महिलांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी चर्चासत्र, तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रदर्शन, रोड शो, इत्यादि या विंगच्या मार्फत नियोजन करण्याचे ठरले आहे. तसेच उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची आरोग्य शिबिरे घेण्याचे या बैठकीत ठरल्याचे अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

बैठकीस उपस्थित असणाऱ्या महिला उद्योजकांनी त्यांचे मत मांडले. काही चांगल्या कल्पना यातून नक्कीच मिळतील आणि औरंगाबाद येथील महिला उद्योजक नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या कामाचा ठसा उमटवतील असे मत त्यांनी मांडले आहे. या माध्यमातून महिला नवनवीन तंत्रज्ञान, तसेच अन्य कौशल्य आत्मसात करतील आणि या सगळ्या गोष्टी मसिआ संघटनेच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास यावेळी उपस्थिती महिला उद्योजकांनी व्यक्त केला.