औरंगाबाद : अनलॉक नंतर हळूहळू सर्वच उद्योग रुळावर येत आहेत. तरी सुद्धा औरंगाबादेतील काही बाजारपेठा पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत.
उत्पादित मालाला उठाव मिळत नसल्यामुळे ऑर्डरचे प्रमाण घटले असून 70% वर येऊन पोहोचले आहे.
सप्टेंबर ऑक्टोबरच्या लॉकडाऊननंतर उद्योजकांना गती मिळाली होती. परंतु आता पुन्हा
दुसरा लॉकडाऊन लागल्यामुळे उद्योजकांना आर्थिक फटका बसला आहे. यंदा लॉकडाऊन मध्ये उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी होती. परंतु ,बाजार पेठा बंद होत्या, त्यामुळे उद्योजकांची उत्पादन क्षमता 40- 50 टक्क्यांपर्यंत घसरली.
सात जून पासून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले होते. परंतु डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे परत लॉकडाऊन करण्यात आले. यावेळी सुद्धा प्रशासनाच्या आदेशानुसार बाजार पेठांवर निर्बंध लावण्यात आले.आता उद्योग सुरू असले तरीही बाजारपेठा मर्यादित वेळेसाठी सुरु असल्यामुळे हवा तसा विकल्या जात नाही.
औरंगाबादेतील उद्योगांची उत्पादन क्षमता 70 % पोहोचली आहे. सध्या परिस्थितीमूळे कुशल उद्योजक कामगारांची टंचाई भासत आहे. लॉकडाऊन मध्ये गेलेल्या परप्रांतीय कामगार आता परत येत असले तरी देखील कामगारांची संख्या कमी आहे. काही दिवसात येणारे सण, गणपती, दिवाळी, दसरा यांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला तर यामुळे का होईना उद्योगाला गती मिळेल अशी आस जोक लावून बसले आहेत.