PF संबंधी केंद्रानं केली ‘ही’ मोठी घोषणा; ७२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणकोणत्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि कर्मचारी दोघांना भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

सरकारने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या ईपीएफसाठी विशेष आर्थिक पॅकेजमधून २५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील तीन महिने कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे. पुढचे तीन महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही सरकारच पीएफचा पैसे भरणार आहे.

उद्योग आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीचा भार उचलणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे १२ टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे.कंपन्यांना कर्माचाऱ्यांच्या पीएफमधील योगदान आधी १२ टक्के इतके बंधनकारक होते. आता त्यात सरकारने कपात केली. खासगी कंपन्यांना आता १० टक्के इतके कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये योगदान द्यावे लागेल. १०० पर्यंत कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांमधील १५००० पर्यंत पगार असणाऱ्या कामगारांच्या पीएफचे योगदान हे सरकार भरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment