कर्मचाऱ्यांना EPFO चं दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट; 6 कोटी लोकांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीच्या आधी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळालेली आहे. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन दिवाळीपूर्वी मोदी सरकारने जवळपास 6 कोटी सदस्यांना एक मोठं गिफ्ट दिलेले आहे. सरकारने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स म्हणजे EDLI ही योजना चालू केली. या योजनेची आता शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 नंतरही वाढवणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी घेतलेला आहे. त्यांनी सांगितले की, EPOF च्या सर्व सदस्यांना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती निधीचा लाभ मिळणार आहे. या सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण कवच देखील मिळणार आहे.

खाजगी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी यासाठी ईपीएफओ खात्यामध्ये गुंतवणूक केली जाते. हा एक प्रॉव्हिडंट फंड आहे. या EPFO मध्ये कर्मचारी प्रत्येक महिन्याला त्याच्या वेतनातून जवळपास 12% रक्कम फंडात गुंतवत असतात. यासाठी कंपनी देखील मदत करते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर व्यक्तीच्या ईपीएफओवर त्याची पत्नी ही नॉमिनी लागते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वारसदाराला पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती पूर्वी त्याचा मृत्यू झाला, तरी ही रक्कम त्याच्या पत्नीला देता येते.

काय आहे सरकारची EDLI योजना ?

कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला किंवा दुर्घटना घडली, तर त्याच्या कुटुंबीयांना या विम्याच्या रकमेवर दावा करता येतो. विम्याची रक्कम एक रकमी देखील वारसदाराला मिळते. या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसदाराला रक्कम देते. ही रक्कम जवळपास 7 लाख रुपये एवढी आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतना आधारे ही विम्याची रक्कम ठरवली जाते.