EPFo Claim Settlement | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गुंतवणूक करत असतात. हे पैसे त्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी मिळत असतात. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओमध्ये मोठा बदल केलेला आहे. म्हणजेच जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचे निधन झाले. आणि त्यांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी जोडले नसेल, किंवा माहिती जुळत नसेल, तरी देखील त्यांच्या नॉमिनींना आधार डिटेल शिवाय पीएफ खात्याची रक्कम मिळू शकणार आहे. याआधी नॉमिनीच्या आधार डिटेल्सशिवाय त्या व्यक्तीला पैसे मिळू शकत नव्हते. परंतु आता हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
ईपीएफओने (EPFo Claim Settlement) यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलेले आहे. आणि त्यानुसार आता मृत्यू झाल्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील जोडण्यात आणि इतर चौकशी करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नॉमिनीला पैसे मिळण्याचे उशीर होत होता.
प्रादेशिक अधिकारी देणार मंजुरी | EPFO Claim Settlement
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीचा मृत्यूनंतर आधार तपशील दुरुस्त करता येत नसल्याने, आता अशा प्रकरणांमध्ये आधार लिंक न करता प्रत्यक्ष आधारावर पडताळणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या परवानगी नंतरच हे आता करता येणार आहे.
हे नियम लागू होणार
ईपीएफ युएएनमध्ये सदस्याचा तपशील जरी योग्य असला तरी आधार डेटामध्ये चुकीचा असेल अशा प्रकरणांमध्ये हा नियम लागू होईल. आधार तपशील ना देतात एखाद्या सदस्याचा जर मृत्यू झाला, तर नॉमिनीला आधार तपशील सिस्टीममध्ये सेव होईल आणि त्याला स्वाक्षरी करण्याची देखील परवानगी दिली जाईल.