Tuesday, February 7, 2023

EPFO: कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते खुशखबर; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

- Advertisement -

नवी दिल्ली । वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोकरदारांना दिलासा देण्यासाठी सरकार PF वरील व्याजदरात वाढ करू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) पुढील महिन्यात मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत 2021-22 साठी PF डिपॉझिट्सवरील व्याजदरांबाबत निर्णय घेऊ शकते. सूत्रांचे म्हणणे आहे की, “या बैठकीत 2021-22 साठी पीएफ ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकते.”

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की,”EPFO ​​ची CBT ची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे. त्यात 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याच्या प्रस्तावाची लिस्ट आहे. EPFO 2021-22 तसेच 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवेल का, असे विचारले असता, CBT प्रमुख यादव म्हणाले की,”पुढील आर्थिक वर्षाच्या कमाईच्या अंदाजाच्या आधारे हा निर्णय घेण्यात येईल.”

- Advertisement -

आता 8.5 टक्के व्याज मिळते
CBT ने मार्च 2021 मध्ये 2020-21 साठी EPF डिपॉझिट्सवर 8.5 टक्के व्याजदर निश्चित केला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याला मंजुरी दिली होती. त्यानंतर EPFO ​​ने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना 2020-21 साठी ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्याचे निर्देश दिले होते.

अर्थमंत्रालयाची परवानगी आवश्यक
CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविला जातो. तेथून मंजुरीनंतर व्याजदर निश्चित केला जातो. मार्च 2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला.

2015-16 मध्ये सर्वाधिक दर

आर्थिक वर्ष       व्याज दर

2019-20         8.50 टक्के

2018-19         8.65 टक्के

2017-18         8.55 टक्के

2016-17         8.65टक्के

2015-16         8.80 टक्के

2014-15         8.75 टक्के

2013-14         8.75 टक्के

2012-13         8.50 टक्के

2011-12         8.25टक्के