EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना EPFO ​​कडून दिली जाते पेंशन !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO  : कोरोनाच्या साथीमुळे अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. या दरम्यान काही कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनामुळे मरण पावले आणि मुले अनाथ झाली अशा अनेक बातम्या समोर आल्या. मात्र हे जाणून घ्या कि, अशा मुलांना कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत आर्थिक मदत मिळू शकेल. मात्र, ज्यांचे पालक नोकरी करत होते आणि EPS सदस्य होते अशा अनाथ मुलांनाच हा लाभ दिला जाईल. EPFO कडून EPS योजनेअंतर्गत अनाथ मुलांना देण्यात येणाऱ्या फायद्यांविषयीची माहिती देण्यात आली आहे.

Orphan children get benefit under EPS, know how much pension they will get.  EPS employee pension scheme know benefits for orphan kids PiPa News | PiPa  News

EPS अंतर्गत कोणते फायदे दिले जात आहेत ???

– अनाथ मुलांना विधवा पेन्शनच्या 75 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.
– ही रक्कम दरमहा किमान 750 रुपये असेल.
– दोन्ही मुलांपैकी प्रत्येकाला दरमहा 750 रुपये पेन्शन मिळेल.
– या योजनेंतर्गत अनाथ मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन दिली जाईल.
– मुलांना काही अपंगत्व आले असेल तर त्यांना आयुष्यभर पेन्शन दिली जाईल. EPFO

EPFO Alert! Know EPS benefits payable to orphans, children, widows &  widowers - Check complete details here | Zee Business

पेमेंट कसे करायचे ???

EPS साठी कंपनी कर्मचार्‍यांच्या पगारातून एकही पैसा कापत नाही.
कंपनीच्या योगदानाचा काही भाग EPS मध्ये जमा केला जातो.
नवीन नियमानुसार 15,000 रुपयांपर्यंत बेसिक सॅलरी असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे.
पगाराच्या 8.33 टक्के रक्कम EPS मध्ये जमा केली जाते.
बेसिक सॅलरी 15,000 रुपये असताना, कंपनी EPS मध्ये 1,250 रुपये जमा करते. EPFO

5.18 cr join formal workforce in 5 yrs, says EPFO data; Youth join in large  numbers |

फक्त लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल

पेन्शनधारकांना कर्मचारी पेन्शन योजना-1995 (EPS-95) अंतर्गत पेन्शनच्या पेमेंटसाठी लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल. दरवर्षी पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेन्शन मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाही. EPFO

हे पण वाचा : https://www.epfindia.gov.in/

‘या’ बँकाकडून कमी व्याज दरात मिळेल Home Loan !!!

Medicine : ‘या’ 19 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदीची टांगती तलवार !!!

Nazara Tech. च्या शेअर्सद्वारे मोठ्या कमाईची संधी, गेल्या 5 सत्रांमध्ये झाली 40 टक्क्यांनी वाढ

Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज नरमाई !!! नवीन दर तपासा