हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Epstein File । १९ डिसेंबरला देशात मराठी माणूस पंतप्रधान होईल असं मोठं भाकीत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी एपस्टिन फाईल्सचा दाखला दिला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी आणि अभ्यासू नेत्याने इतकं मोठं विधान केल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केल्याप्रमाणे काल अमेरिकन संसदेत एपस्टिन फाईल्सबाबत काही फोटोही समोर आले. यात बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्य दिग्गजांचे फोटो समोर आले. मात्र भारतातील कोणाचेही नाव अजूनही समोर आलं नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण याना विरोधकांकडून ट्रॉल केलं जात आहे. मात्र आज पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणात थेट पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) नाव घेत खळबळ उडवून दिली आहे
मोदीज ऑन बोर्ड- Epstein File
आज कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी सांगितलं कि, स्टीव्ह व्हॅलन नावाचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा सल्लागार होता, तो एपस्टीन याला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांनी, मोदींशी भेटायचं आहे. एपस्टीन कडून उत्तर येते की मी प्रयत्न करतो. मग काही दिवसानंतर तो सांगतो की मोदीज ऑन बोर्ड. म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत, असा तो ई-मेल आहे.मग प्रश्न असा आहे की एपस्टीन आणि मोदींचे संबंध कुठे आणि कसे आले, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीनच्या ईमेलमध्ये (Epstein File) उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव असल्याचा दावा केला. तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (तत्कालिन अमेरिकन राजदूत) यांचा उल्लेख असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. हरदीप पुरी हे न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांची आणि एपस्टीन यांच्या अनेकवेळा भेटीगाठी झाल्याचा उल्लेख आलेला आहे. मी काही सगळी कागदपत्रं तपासली नाहीत. कारण हा 300 GB डेटा आहे.लक्षावधी फोटोग्राफ,लक्षावधी कागदपत्रं, लक्षावधी ई-मेल्स आहेत. या डेट्यात सर्व माहिती काढली जाऊ शकते. पण ते काही सोप्प काम नाही.तर जगातील सर्व मीडियाला आता यापुढे काही आठवडे हेच काम राहिल असं चव्हाण यांनी म्हंटल




