Equitas Small Finance Bank च्या FD वर जास्त व्याज मिळवण्याची संधी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Equitas Small Finance Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता Equitas Small Finance Bank ने देखील गुरुवारी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत डोमेस्टिक आणि NRE/NRO खात्यांवरील फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने नुकतेच आपल्या कामकाजाची 7 वर्षे पूर्ण केली आहेत.

Equitas Small Finance Bank's Q2 net profit more than doubles to ₹103 cr | Mint

FD वर मिळेल 7.32% पर्यंत व्याज

या खास ऑफर अंतर्गत, 8 कालावधीचे व्याज दर 7 बेसिस पॉईंट्सवरून 37 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढवण्यात आले आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, बेसिस पॉईंट्स (bps) म्हणजे टक्केवारीचा शंभरावा भाग. आता बँकेकडून 888 दिवसांच्या FD वर ग्राहकांना 7.32 टक्के पर्यंत वार्षिक व्याज दिले जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाईल. Equitas Small Finance Bank

equitas small finance bank share price: Equitas Small Finance Bank gains 9% on strong Q1 business update - The Economic Times

देशांतर्गत खात्यांवरील Equitas SFB FD दर (2 कोटींच्या खाली, सप्टेंबर 1-7, 2022)

1 वर्ष ते 18 महिने: 6.82% व्याज, 7% वार्षिक उत्पन्न
18 महिने 1 दिवस ते 2 वर्षे: 6.82% व्याज, 7.00% वार्षिक उत्पन्न
2 वर्षे 1 दिवस 887 दिवस: 7.07% व्याज, 7.26% वार्षिक उत्पन्न
888 दिवस: 7.32% व्याज, 7.52% वार्षिक उत्पन्न
889 दिवस ते 3 वर्षे: 7.07% व्याज, 7.26% वार्षिक उत्पन्न
3 वर्षे 1 दिवस ते 4 वर्षे: 6.07% व्याज, 6.21% वार्षिक उत्पन्न
4 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: 6.07% व्याज, 6.21% वार्षिक उत्पन्न
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: 6.07% व्याज, 6.21% वार्षिक उत्पन्न

PM Modi launches 2 RBI schemes. All about the central bank initiatives - Hindustan Times

RBI ने रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे.

अलीकडेच RBI कडून रेपोदरात 0.5 टक्क्यांनी वाढ करून 5.4 टक्के करण्यात आला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेटमध्ये 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. Equitas Small Finance Bank

Fixed Deposit (FD): If you are planning to get FD, then keep these 5 things in mind including laddering and short term FD, it will benefit more - Business League

बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सच्या दरात वाढ

अलीकडेच एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक,पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक इत्यादी बँकांनी देखील आपल्या एफडीवरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीं दर वाढवण्यास सुरूवात केली आहे.  Equitas Small Finance Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.equitasbank.com/fixed-deposit-applynow.php?q=fd

हे पण वाचा :

Yes Bank कडून नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट FD च्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा!!!

Multibagger Stock : गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Business Idea : केळीच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे करा भरपूर कमाई !!!

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये चांगल्या नफ्यासह मिळवा कर सवलतीचा लाभ !!!

चोरी करून स्विच ऑफ केलेल्या फोनचे ‘या’ App द्वारे कळेल लोकेशन