व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये चांगल्या नफ्यासह मिळवा कर सवलतीचा लाभ !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : अल्पबचत योजना या गुंतवणुकीच्या लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहेत. यामधील गुंतवणूकीसाठी कोणतीही जोखीम नसते. हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसकडूनही आपल्याला अशाअल्पबचत योजनेची ऑफर दिली जाते. जिचे नाव आहे नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (NSC) स्कीम. याद्वारे आपल्याला फक्त चांगला रिटर्नच मिळत नाही तर टॅक्समध्ये सूट देखील मिळते.

All about National Savings Certificate (NSC) withdrawal, transfer and tax benefits – myMoneySage Blog

कमी जोखीम आणि खात्रीशीर नफा

नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट ही भारत सरकारचा पाठिंबा असलेली एक टॅक्स बचत करणारी योजना आहे. जी देशातील कोणत्याही Post Office मधून खरेदी करता येईल यामध्ये चांगला नफा आणि कमी जोखीमीची खात्री देण्यात आली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बहुतेक लोकांकडून बँकेमध्ये एफडी केली जाते. मात्र, हे लक्षात घ्या कि, बँकेच्या एफडीपेक्षा अल्पबचत योजनांमध्ये पैसे लवकर दुप्पट होतात.

Why to invest in National Saving Certificate ?

5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी

या योजनेमध्ये आपल्याला कमीत कमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच आपल्याला हवे असेल याहून जास्त रकमेची देखील NSC खरेदी करता येईल. 5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असलेल्या या योजनेवर सध्या 6.8 टक्के दराने वार्षिक व्याज दिले जाते, जे FD पेक्षा जास्त आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळेल. मात्र, ही सूट फक्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरच उपलब्ध असेल. यामध्ये 100, 500, 1000, 5000, 10,000 किंवा त्याहून जास्त रकमेचे सर्टिफिकेट उपलब्ध आहेत. Post Office

How to invest in National Savings Certificate: Rules, maturity, interest rate, risk of Govt-backed small-savings scheme | Personal News – India TV

NSC 3 प्रकारात मोडतात

NSC घेण्याचे मुख्यतः तीन मार्ग आहेत. यातील पहिला म्हणजे सिंगल होल्डर टाइप सर्टिफिकेट. या अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून NSC खरेदी करता येतील. यातील दुसरा म्हणजे, जॉईंट ‘ए’ टाइप सर्टिफिकेट आहे. यामध्ये दोन गुंतवणूकदारांना मिळून NSC खरेदी करता येतील. तसेच मॅच्युरिटीची रक्कम दोघांना समान भागांमध्ये दिली जाईल. यातील तिसरा म्हणजे जॉईंट ‘बी’ टाइप सर्टिफिकेट. हे देखील दोन लोकांना मिळून खरेदी करता येतील, मात्र यामध्ये मॅच्युरिटीची रक्कम फक्त एकालाच दिली जाईल. Post Office

हे लक्षात घ्या कि, कोणत्याही भारतीय नागरिकाला NSC मध्ये गुंतवणूक करता येतील. यामध्ये प्रौढ व्यक्ती, वैयक्तिकरित्या किंवा जॉईंटपणे (3 प्रौढांपर्यंत), 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालकांना NSC मध्ये गुंतवणूक करता येईल. कोणत्याही अनिवासी भारतीय नागरिकाला NSC खरेदी करता येणार नाही. तसेच, NRI होण्याआधीच त्यांच्याकडे NSC असेल तर ती मॅच्युर होईपर्यंतच कायम ठेवता येईल. Post Office

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव पहा

Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!