राष्ट्रीय मार्गावर इर्टींगा चारचाकी आणि दुचाकीचा अपघात : आठजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगळूर महामार्गावरील पाचवड फाटा येथे चारचाकी इर्टीगा गाडी आणि दुचाकीचा अपघात जोरदार अपघात झाला आहे. अपघातातील दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून आठजण जखमी झालेले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झालेले असून पंचमाना करण्याचे काम सुरू आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरहून कराडच्या दिशेला जाणाऱ्या लेनवरती चारचाकी (क्रमांक एमएच-12- केएन- 5963) व दुचाकीचा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास झाला. चारचाकी गाडीतील सहाजण तर दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचासाठी कराड येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कराड शहर पोलिस ठाण्याचे प्रशांत जाधव, श्री. इनामदार हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी अपघात पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. चारचाकी गाडीचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

Leave a Comment