खरीपाचे गावनिहाय नियोजनासाठी कृषी समितीची स्थापना

कोल्हापूर | खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामस्तरीय कृषी समितीची स्थापना करण्यात येत असून संपूर्ण गावाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन गावाचे तालुक्याचे जिल्हावार नियोजन प्रस्तावित आहे. सर्व पालकमंत्र्यांकडे नियोजन आल्यानंतर सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी कृषी अधिकारी पातळीवर आम्ही बैठक घेत आहोत अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राज्यातील कृषी अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना भुसे म्हणाले की, खरिपाच्या पार्श्वभूमीवर यंदा बियाण्यांची आणि खतांची उपलब्धता याला प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या वर्षी सोयाबीन बियाणे बाबत अडचण निर्माण झाली होती. यंदा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांकडून सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे यंदा नाविन्यपूर्ण प्रयोग यावर भर देण्यात येणार आहे. हे प्रयोग पाहून त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना कसा होईल याचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसंच मागणी असलेल्या वाणांची लागवड करून शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे यावेळी दादा भुसे यांनी सांगितलं.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई खासदार धैर्यशील माने उल्हास पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group