ईटीजी अॅग्रो इंडियाकडून ‘ब्रॅण्‍ड प्रो-नट्स’सह भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमेटेड नट्स-अॅलमण्‍ड्स प्रोसेसिंग प्‍लाण्‍टच्‍या कार्यसंचालनाचा शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईटीसी अॅग्रो प्रोसेसिंग इंडिया प्रा. लि.सह जागतिक डाळी प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठी प्रोसेसर्स व विक्रेता कंपनी आहे. कंपनीने नुकतेच गुजरातमधील खेडा येथे १०० हून अधिक सक्षम महिला कामगार असलेले अत्‍याधुनिक नट्स – अॅलमण्‍ड्स प्रोसेसिंग प्‍लाण्‍टचे कार्यसंचालन सुरू केले आहे. मूलत: डाळी प्रोसेसर असलेल्‍या ईटीजी अॅग्रो इंडियाचा या नवीन उत्‍पादन रेंजची भर करण्‍यासोबत नवीन महसूल प्रवाह निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न भारतीय बाजारपेठेमध्‍ये नट्सच्‍या वाढत्‍या मागणीच्‍या आधारावर आहे. ईटीजी इंडिया नवीन व्‍यवसाय प्रवाहांसह त्‍यांची उपस्थिती वाढवण्‍यास सज्‍ज आहे. बदामांचे सादरीकरण ही फक्‍त सुरूवात आहे.

प्रोसेसिंग युनिटचे बदामांचे डिशेलिंग व प्रक्रियेवर लक्ष केंद्रित आहे. हे प्रोसेसिंग युनिट बदामांवर प्रक्रिया करणा-या भारतातील सर्वात मोठ्या प्‍लाण्‍ट्सपैकी एक आहे. प्‍लाण्‍टची प्रक्रिया क्षमता प्रतिवर्ष १०,००० एमटीहून अधिक कच्‍चे बदाम उत्‍पादित करण्‍याची आहे. वर्गीकरण करणारा विभाग पूर्णत: कुशल महिला कामगारांद्वारे संचालित आहे. या महिला कामगारांना हाताने निवडलेल्या, विभागणी करण्‍यात आलेल्या उच्‍च दर्जाच्‍या बदामांचा पुरवठा करण्‍यासाठी निवडण्‍यात आले आहे. नट्सचे बदामांसह ब्रॅण्‍ड ‘ईटीजी अॅग्रो नटूर्झ – प्रो नट्स’ अंतर्गत मोठ्या प्रमाणात व ग्राहक पॅक स्‍वरूपांमध्‍ये विपणन करण्‍यात येईल आणि त्‍यानंतर अक्रोड, पिस्‍ता व काजूंचे विस्‍तारीकरण करण्‍यात येईल.

ईटीजी अॅग्रो इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पराग गद्रे म्‍हणाले, ”सध्‍या घरामध्‍ये रोजचा आहार व एकूण स्‍नॅकिंगच्‍या सेवनामध्‍ये काही रोचक ट्रेण्‍ड्स दिसून येत आहेत. भौगोलिक क्षेत्रातील, तसेच विविध वयोगटातील ग्राहक घरामध्‍ये आहाराची निवड करताना मानसिक आरोग्‍यासह शारीरिक आरोग्‍याला महत्त्व देत आहेत. भारतीय किचनमध्‍ये शाकाहारी प्रथिनयुक्‍त आहार बनवण्‍याला प्राधान्‍य दिले जात आहे. कोविड-१९ महामारी व त्‍यामुळे करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊन्‍समुळे अनेक लोक घरामध्‍येच कूकिंग, बेकिंग करण्‍यासोबत सहजपणे उपलब्‍ध होणारे स्‍टेपल्‍स, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि नट्स सारखे वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍नॅक्‍स व मंचीजसह प्रयोग करत आहेत. या वर्तणूकीमधील ट्रेण्‍ड्समुळे नट्सच्‍या, विशेषत: बदामांच्‍या सेवनामध्‍ये वाढ झाली आहे. पण, भेसळयुक्‍त नसलेल्या, स्‍वच्‍छ व आरोग्‍यदायी नट्सच्‍या पुरवठ्यामध्‍ये मोठी पोकळी आहे. आमच्‍या निदर्शनास आले आहे की, संस्‍थात्‍मक ग्राहक व स्‍थानिक व्‍यापारी भारतीय बाजारपेठेत प्रतिष्‍ठा स्‍थापित केलेल्‍या विश्‍वसनीय जागतिक भागीदाराची दीर्घकाळापासून वाट पाहत आहेत आणि येथेच ईटीजी उपयुक्‍त ठरते. ईटीजी प्रो नट्स प्‍लाण्‍टचा भारतीय नट्स व्‍यापारी व संस्‍थात्‍मक ग्राहकांसाठी सक्षम भागीदार असण्‍यासोबत ग्राहकांना शुद्ध व आरोग्‍यदायी नट्स देण्‍याचा मनसुबा आहे.”

श्री. गद्रे पुढे म्‍हणाले, ”ईटीजी इंडियाचा नट्स व्‍यवसाय पोर्टफोलिओमध्‍ये हस्‍तक्षेप व प्रवेश हा ग्राहकांवर मोठी छाप पाडत असलेले वाढते फूड्स, साहित्‍य, मूल्‍यवर्धित प्रक्रिया केलेले स्‍टेपल्स, प्‍लाण्‍ट-आधारित प्रोटीन उपयोजने आणि घटकांमध्‍ये विविधता आणणा-या दीर्घकालीन धोरणात्‍मक व्‍यवसाय योजनेचा भाग आहे. नजीकच्‍या भावी काळात प्‍लाण्‍टचा मिठाई, बिस्किटे, आईस्‍क्रीम्‍स आणि इतर युजर उद्योगक्षेत्रांसाठी नट्स घटक उत्‍पादित करण्‍याचा मनसुबा आहे. ईटीजी अॅग्रो इंडियाने स्‍थानिक महिलांसाठी रोजगार निर्माण करण्‍यावर विशेष भर दिला आहे आणि त्‍याअनुषंगाने, प्‍लाण्‍टच्‍या वर्गीकरण विभागाचे कार्यसंचालन करण्‍यासाठी आवश्यक कौशल्‍ये असलेल्‍या १०० हून अधिक स्‍थानिक महिला कामगारांना नियुक्‍त केले आहे. पुढील दोन वर्षांमध्‍ये कंपनीचा स्‍थानिक समुदायामधील ३०० हून अधिक महिलांना प्रत्‍यक्ष रोजगार देण्‍याचा मनसुबा आहे.”

नट्स बिझनेसचे प्रमुख श्री. कपिल यादव म्‍हणाले, ”ईटीजी प्रो नट्स उच्‍च दर्जाचे आहेत. बदामांची प्रक्रिया करताना पाण्‍याचा जरादेखील वापर केला जात नाही, त्‍यामध्‍ये कोणतेच मिश्रण नसते आणि वर्षभर सातत्‍याने बदामांचा पुरवठा केला जातो. ईटीजी प्रो नट्स (अॅलमण्‍ड) प्‍लाण्‍ट हे प्रतितास ३.५ एमटीहून अधिक क्षमता असलेले अत्‍याधुनिक प्रोसेसिंग केंद्र आहे. या प्‍लाण्‍टची स्‍थापना आणि नोव्‍हेंबर-२० मध्‍ये प्‍लाण्‍टच्‍या कार्यसंचालनाची सुरूवात ही विशेषत: कोविड काळादरम्‍यान प्रशंसनीय कामगिरी राहिली आहे. भारतामध्‍ये नट्स बाजारपेठेसाठी मोठी क्षमता आहे. विकसित देशांमध्‍ये बदामांसारख्‍या नट्सचे सेवन जवळपास दहा पट आहे. उदाहरणार्थ, भारतामध्‍ये प्रति दरडोई नट्सचे सेवन प्रतिवर्ष ६० ते ७० ग्रॅम आहे, तर जागतिक बाजारपेठांमधील सेवन प्रतिवर्ष ५५० ग्रॅमहून अधिक आहे. भारतीय कुटुंबांच्‍या मुख्‍य आहारामध्‍ये नट्सचा समावेश असण्‍यासोबत अधूनमधून नट्सचे सेवन देखील केले जाते. ज्‍यामुळे नट्स हे अतिरिक्‍त किंवा प्रत्‍यक्ष स्‍नॅकिंग म्‍हणून मुख्‍य अन्‍न पर्याय बनत आहेत. पॅलेट संपन्‍न असलेल्‍या नट्समध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटक असण्‍यासोबत मूठभर नट्समध्‍ये वाढीस अनुकूल अशी प्रथिने असतात. भारतातील नट्सची वाढती व्‍यवसाय क्षमता आणि जागतिक विभागीय कौल्‍यामुळे ईटीजी इंडियाला नवीन महसूल प्रवाह म्‍हणून या विभागामध्‍ये प्रवेश करण्‍यास मदत झाली आहे.”

ईटीजी अॅग्रो इंडिया स्‍थानिक उत्‍पादकांकडून अक्रोड/ काजू आणि यूएसए व ऑस्‍ट्रेलिया अशा जागतिक मूळ ठिकाणांमधून बदामांसारख्‍या नट्सचा पुरवठा करेल. कंपनीने प्रमुख पुरवठादारांसोबत भागीदारी केली आहे. वर्ष २०२१-२२ मध्‍ये कंपनीला ८००० एमटीहून अधिक विक्री होण्‍याची अपेक्षा आहे.

इतर नट प्रकारांच्‍या तुलनेत अतिरिक्‍त व जलद स्‍नॅकिंग म्‍हणून आता बदामांसाठी मागणी वाढली आहे. उत्तर व पश्चिम भारत या प्रमुख बाजारपेठा आहेत, पण बदाम पूर्व व दक्षिण बाजारपेठांमध्‍ये देखील झपाट्याने प्रवेश करत आहेत. बदाम अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी ऑनलाइन व भौतिक वितरण नेटवर्क्‍सचा वापर करण्‍यात येईल. कंपनीने अगोदरच ऑनलाइन रिटेलर्ससोबत प्रमुख ब्रिक अॅण्‍ड मोर्टार स्‍वरूपातील साखळ्यांना पुरवठा करण्‍यास सुरूवात केली आहे. कंपनी सामान्‍य व्‍यापारामध्‍ये उत्‍पादन ठेवणा-या विविध शहरांमधील प्रमुख घाऊक विक्रेत्‍यांवर लक्ष केंद्रित करत आहे.

ईटीजी अॅग्रो इंडिया भारतभरातील कृषी व बंदरांच्‍या जवळ असलेल्‍या एकीकृत कृषी-पायाभूत सुविधांमुळे वरचढ ठरते. कंपनीचे ३००० हून अधिक चॅनेल भागीदार व देशव्‍यापी वितरण नेटवर्क आहे. महाराष्‍ट्र, गुजरात व पश्चिम बंगालमधील प्रतिवर्ष ५ लाख एमटीहून अधिक प्रक्रिया क्षमता असलेल्या आयएसओ प्रमाणित डाळी प्‍लाण्‍ट्स ईटीजीला सर्वात मोठी डाळी प्रक्रिया करणारी कंपनी बनवतात.

ईटीजी अॅग्रो इंडिया बाबत

ईटीजी अॅग्रो इंडिया तिचा प्रमुख उद्यम ईटीसी अॅग्रो प्रोसेसिंग इंडिया प्रा. लि.च्‍या माध्‍यमातून डाळींमधील सर्वात मोठी प्रोसेसर व विक्रेता कंपनी म्‍हणून अग्रस्‍थानी आहे. कंपनी ग्‍लोबल अॅग्री-समूह ईटीजी ग्रुपचा भाग आहे आणि जॅपनीज कंपनी – मित्‍सुई ही धोरणात्‍मक गुंतवणूकदार आहे.  कंपनीची गुजरात, महाराष्‍ट्र व पश्चिम बंगालमधील ३ केंद्रांमध्‍ये विस्‍तारित प्रतिवर्ष ५,००,००० मेट्रिक टन (एमटीपीए) एकूण डाळी प्रक्रिया करण्‍याची क्षमता आहे. कंपनीचे मुख्‍यालय मुंबईमध्‍ये आहे.

शेतकरी, संस्‍थात्‍मक ग्राहक व सरकार सारखे भागधारक ईटीजी नेटवर्कचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.  ईटीजी इंडिया ही सर्वात मोठी डाळी प्रक्रिया करणारी कंपनी आहे. कंपनीचा ग्राहकांना डाळी किफायतशीरपणे उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रथिने देत भारताला प्रथिन-संपन्‍न देश बनवण्‍याचा मनसुबा आहे. ईटीजीचा दर्जात्‍मक उत्‍पादने व प्रक्रियांच्‍या माध्‍यमातून रोजचे पोषण देत, ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करत मूल्‍यवर्धित विविध कृषी-उत्‍पादनांमधील अग्रणी कंपनी असण्‍याचा देखील मनसुबा आहे.

Leave a Comment