Ethiopia Calendar : 13 महिन्यांचे 1 वर्ष!! अजूनही 2017 मध्ये जगतोय हा देश

Ethiopia Calendar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ethiopia Calendar । मित्रानो, एका वर्षात १२ महिने असतात हे तर तुम्हाला माहितीच असेल .. फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वच देश या नियमाप्रमाणे चालतोय.. आपल्या कॅलेंडर मध्ये १२ महिन्यांचेच एक वर्ष तयार होत… परंतु जगात असाही एक देश आहे जिथे १३ महिन्यांनी एक वर्ष वर्ष पूर्ण होते. होय, वाचायला जरी वेगळं वाटत असलं तरी हे खरं आहे. या देशाचे नाव आहे इथिओपिया, जो आफ्रिका खंडात आहे. इथले नागरिक ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन करत नाही, तर स्वतःचे ‘गीझ कॅलेंडर’ आहे. या कॅलेंडर मध्ये १२ ऐवजी १३ महिने आहेत. यातील शेवटचा म्हणजे 13 वा महिना ‘पॅग्युम’ फक्त 5 किंवा लीप वर्षात 6 दिवसांचा असतो. त्यामुळे त्यांची वेळ मोजण्याची पद्धतच आपल्या जगाच्या मोजणीपेक्षा पूर्ण वेगळी आहे.

कॅलेंडर मधील या अनोख्या बदलामुळे (Ethiopia Calendar) इथिओपिया हा देश जगाच्या तुलनेत तब्बल ७ वर्ष मागे आहे. म्हणजेच आज एकीकडे संपूर्ण जग २०२५ मध्ये असताना इथिओपिया हा देश अजूनही २०१७ मध्ये जगतोय. याचे कारण रोमन चर्चने केलेल्या कॅलेंडर सुधारणांचा अवलंब न करणे आहे. २०१९ मध्ये, जेव्हा कोरोनाने संपूर्ण जगावर दार ठोठावले, तेव्हा २०१२ हे वर्ष इथिओपियन कॅलेंडरमध्ये चालू होते. इथिओपियामध्ये, जगाच्या इतर भागांप्रमाणे ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्ष साजरे केले जात नाही. येथे, ग्रेगोरियन जानेवारीऐवजी, नवीन वर्षाची सुरुवात ‘मेस्केरेम’ ने होते, जे ११ सप्टेंबर रोजी येते.

एक आठवडा हा ५ दिवसाचा- Ethiopia Calendar

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी लहानपणापासून महिन्यांची नावे वाचली आणि ऐकली आहेत – जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, परंतु इथिओपियामध्ये महिन्यांची नावे देखील वेगळी आहेत. येथे मेस्केरेम, टिकिमट, हिदर, तहसास अशी नावे वापरली जातात. इतकेच नाही तर, आपल्याकडे ७ दिवसांचा एक आठवडा असतो, पण इथिओपिया मध्ये एक आठवडा हा ५ दिवसाचा असतो. त्यामुळे एका महिन्यात त्याठिकाणी ६ किंवा ७ आठवडे भरतात. इथिओपिया केवळ त्याच्या अद्वितीय कॅलेंडरसाठीच नाही तर कॉफीच्या उत्पत्तीसाठी देखील ओळखले जाते. हा एकमेव आफ्रिकन देश आहे ज्याला ब्रिटनने कधीही गुलाम बनवले नाही. इटलीने काही वर्षे ते ताब्यात ठेवले पण ते फार काळ टिकू शकले नाही. अलीकडेच सोशल मीडियावर इथियोपियाच्या या 13 महिन्यांच्या कॅलेंडरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केलं आहे.