हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लंडन येथील हीथ्रो विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये गणले जाते. या विमानतळावरून दरोरोज लाखो प्रवासी रोज ये-जा करतात. इथल्या हवामानामुळे बर्याच वेळा विमानांचे लँडिंग करताना पायलटला संकटांना सामना करावा लागतो. येथे बऱ्याचदा विपरीत हवामानात पायलट त्यांच्या अनुभव आणि धैर्याच्या जोरावर विमान लॅंड करण्यास यशस्वी होतात. अशाच एका विमानाच्या लँडिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पायलट जोरदार वादळात अडकलेले विमान व्हर्टिकली लँड करतो आहे.
या व्हिडिओमध्ये, एतिहाद या विमान कंपनीचे एअरबस ए३८० रनवेच्या व्हर्टिकली लँड होताना दिसत आहे. सोसाट्याचा वारा विमानाला धडकत असताना अगदी कौशल्यपूर्णरीतीने लँड करताना दिसत आहे. श्वास रोखून धरणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक पायलटचे कौतुक करीत आहेत. वैमानिकांनी दर्शविलेल्या कौशल्याचे शब्दांत कथन करता येत नसल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली आहे.
ही घटना १५ फेब्रुवारीची आहे. परंतु, दोन्ही वैमानिकांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. वैमानिक जेव्हा विमान उतरण्याचा प्रयत्न करीत होते, त्यावेळी जोरदार वारा सुरु होता. अशा धोक्याच्या परिस्थितीत या दोन्ही पायलटांनी धैर्य दाखवत विमान जमिनीवर उतरवले.
‘From now on, that’s how you land!’ Earlier today at @HeathrowAirport: @Airbus A380 @EtihadAirways, crosswind landing during #StormDennis. Video: https://t.co/g4gKvMaAb6 ???????? @AirbusPRESS @a380fanclub @stef_schaffrath @sara_rcc @AirbusintheUK pic.twitter.com/VmlK1d25Gs
— Aeronews (@AeronewsGlobal) February 15, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.